पक्ष संघटनेसोबत मिळून संघर्ष करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:24 AM2021-01-15T04:24:10+5:302021-01-15T04:24:10+5:30

देवरी : नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजय मिळविला, तसेच हा ...

Struggle together with the party organization | पक्ष संघटनेसोबत मिळून संघर्ष करा

पक्ष संघटनेसोबत मिळून संघर्ष करा

Next

देवरी : नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजय मिळविला, तसेच हा विजय त्यांच्या एकट्याचा नसून सर्व कार्यकर्त्याच्या परिश्रमाचे फळ आहे. अशाप्रकारे विजयाचे फळ इतरही निवडणुकीत मिळवायचे असेल तर सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेच्या विरुद्ध काम न करता संघटनेसोबत मिळून संघर्ष केला तर नक्की यश मिळेल, असे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव आणि विदर्भाचे प्रभारी आशिष दुआ यांनी केले.

ते विदर्भाच्या दौऱ्यावर आले असता मंगळवारी देवरी येथे कोरोटे भवनात आयोजित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सभेत उपस्थिताना मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी आमदार सहषराम कोरोटे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव आणि गोंदिया जिल्ह्याचे प्रभारी बबनराव तायवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अमर वऱ्हाडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेवराव किरसान, कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले, गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उषा मेंढे, काँग्रेसचे जिल्हा अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष विशाल शेंडे, जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष परवेज बेग, आमगाव तालुका अध्यक्ष संजय बहेकार, युवक काँग्रेस अध्यक्ष उज्ज्वल ठाकूर, शहर अध्यक्ष अजय खेतान, देवरी तालुका अध्यक्ष संदीप भाटिया, तालुका महासचिव बळीराम कोटवार, युवक काँग्रेसचे देवरी तालुकाध्यक्ष बबलू कुरैशी, शहर अध्यक्ष कुलदीप गुप्ता, हमीद मेमन, ॲड. प्रशांत संगीडवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आ. सहषराम कोरोटे यांनी कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद बाजूला सारून संघटित होऊन काँग्रेस पक्षाला कशाप्रकारे बळकट करता येईल यावर लक्ष देण्याची आज गरज आहे. जर सर्वांनी पक्षनिष्ठेने कार्य केल्यास निश्चित यश मिळेल असे सांगितले. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. संचालन माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके यांनी केले, तर आभार जिल्हा कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले यांनी मानले.

Web Title: Struggle together with the party organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.