शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

अटकेने निवळला तणाव

By admin | Updated: March 20, 2015 00:53 IST

माजी नगर परिषद उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पंकज यादव यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना अखेर बुधवारच्या ..

गोंदिया : माजी नगर परिषद उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पंकज यादव यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना अखेर बुधवारच्या सायंकाळी अटक करण्यात आली. त्यामुळे शहरात मंगळवारी सायंकाळपासून निर्माण झालेला तणाव आणि दहशतीचे वातावरण गुरूवारी निवळले. बाजारपेठही पूर्ववत सुरू झाली. मात्र शहरात पोलीस बंदोबस्त कायम होता. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्या दोघांनाही देवरी पोलीस ठाण्यात हलविण्यात आले आहे.येथील नगरसेवक यादव यांच्यावर नगर परिषद कार्यालय परिसरात दोघांनी दीवघेणा हल्ला करून त्यांना जखमी केले. १७ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजतादरम्यान घडलेल्या या घटनेनंतर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यांनतर यादव यांच्या समर्थकांनी शहरातील बाजारपेठ बंद पाडून आपला रोष व्यक्त केला. १८ मार्च रोजी सकाळी शहर पोलीस ठाण्यात गोंधळ घालून हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. या घटनेचे पडसाद बुधवारीही दिसून आले. त्यामुळेच बाजारपेठ पुन्हा दिवसभरापासाठी बंद झाली होती.दरम्यान बुधवारी रात्री १०.१५ वाजता यादव यांच्यावर हल्ला करणाऱ्या कुणाल महावत (२१) व राजेश तांडेकर (२०,रा.सावराटोली) यांना पोलिसांनी अटक केली. गुरूवारी (दि.१९) दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी दोघांना देवरी पोलीस स्टेशनला हलविले आहे. (शहर प्रतिनिधी)