शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक जीवनशैलीत स्त्रियांमधील ताणतणावाचे व्यवस्थापन

By admin | Updated: October 20, 2014 23:15 IST

गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित स्थानिक एस.एस. गर्ल्स महाविद्यालयात गृहव्यवस्थापन विभागाच्या वतीने ‘आधुनिक जीवनशैलीत स्त्रियांमधील ताण-तणावाचे व्यवस्थापन’ या विषयावर एक दिवसीय

गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित स्थानिक एस.एस. गर्ल्स महाविद्यालयात गृहव्यवस्थापन विभागाच्या वतीने ‘आधुनिक जीवनशैलीत स्त्रियांमधील ताण-तणावाचे व्यवस्थापन’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले.विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे हे चर्चासत्र संस्थेचे सरंक्षक प्रफुल्ल पटेल, अध्यक्ष वर्षा पटेल तसेच सचिव आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले. प्राचार्य डॉ.एन.के. बहेकार यांच्या मार्गदर्शनात व अध्यक्षतेखाली सदर चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्राची सुरुवात दीप प्रज्वलन, विद्यापीठ गीत आणि स्वागतगीताने झाली. आपल्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ.एन.के. बहेकार यांनी चर्चासत्राच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथी असलेले एल.ए.डी. कॉलेज नागपुरच्या डॉ. सुनीता बोरकर यांनी चर्चासत्रासंबधी आपले विचार व्यक्त केले. तसेच चर्चासत्राच्या संयोजिका डॉ. रेखा नागपुरे यांनी प्रास्ताविक सादर केले. सदर चर्चासत्र दोन सत्रात विभाजीत करण्यात आले होते. प्रथम सत्राचा उपविषय ‘वर्क प्लेस ट्रेस इन वर्किंग वूमन अ‍ॅन्ड इट्स मॅनेजमेंट’ होता. यावर कॅप्स नागपूरचे प्राचार्य डॉ.ए.एम. शेख यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी अध्यक्षस्थानी शासकीय पी.जी. गर्ल्स कॉलेज रायपूरहून आलेल्या डॉ. पूर्णिमा शाहू होत्या. याप्रसंगी फॅमिली रिसोर्स मॅनेजमेंटतर्फे या विषयाशी सबंधित पोस्टर स्पर्धा झाली. सोबतच गृहसजावट, हस्तनिर्मिती वस्तू आणि विविध आकारप्रकारच्या रांगोळ्यांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. यात प्रा. सीमा बिजेवार यांचे सहकार्य लाभले. जेवणानंतर व्दितीय सत्राला सुरूवात झाली. या सत्राचा उपविषय ‘ट्रेस इन वर्किंग वूमन एन्ड इट्स मॅनेजमेंट’ होते. भिलाई येथील महिला महाविद्यालयाच्या डॉ. संध्या मदनमोहन यांच्या अध्यक्षतेखाली या सत्राचे वक्ते आयुर्वेदिक कॉलेज गोंदियाच्या डॉ. वंदना अलोनी होत्या. तसेच गर्ल्स कॉलेज सुरत, गुजरातहून आलेल्या डॉ. सुहास वैद्य यांनी तणाव व्यवस्थापनासाठी सकारात्मक विचार या विषयावर आपले विचार व्यक्त केले. दोन्ही सत्राचे संचालन प्रा.दिशा गेडाम तसेच प्रा. रिनी वसिष्ठ यांनी केले. तसेच संयोजिका डॉ. रेखा नागपुरे यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी चर्चासत्रात उपस्थित सहभागींनी सादर केलेल्या शोधप्रबंधाला आयएसबीएन क्रमांकसह स्मरणिकेच्या रुपात प्रकाशित करण्यात आले. या स्मरणिकेचे विमोचन मंचावर उपस्थित चर्चासत्राचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुषमा नरांजे व ग्रंथपाल राजश्री वाघ यांनी केले. डॉ. रेखा नागपुरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थिनींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)