शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची लूट त्वरित थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST

जि.प.च्या सभागृहात सोमवारी सत्तारूढ पदाधिकारी व सदस्यांच्या कार्यकाळातील अखेरची सर्वसाधारण सभा पार पडली. जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. या वेळी विषय समितीचे सभापती व जि.प.सदस्य उपस्थित होते. सद्या शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. बी-बियाणे व खताची विक्री जोमात सुरू आहे. मात्र या विक्रीवर नियंत्रण नाही.

ठळक मुद्देजि.प.च्या सर्वसाधारण सभेत : कृषी विभागाचे काढले वाभाडे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना शेतीचा हंगाम सुरू झाला. शेतकरी संकटात आहे. पुरेसा पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे संकट आहे.बियाणे उगवले नसल्याच्या तक्र ारी आहेत. युरिया खत अवाजवी दराने विक्र ी केला जात आहे. कृषी विभागाचे अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत. शेतकऱ्यांचा कुणी वाली आहे की नाही. अशा तीव्र शब्दात सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी कृषी विभागाचे वाभाडे काढले.जि.प.च्या सभागृहात सोमवारी सत्तारूढ पदाधिकारी व सदस्यांच्या कार्यकाळातील अखेरची सर्वसाधारण सभा पार पडली. जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. या वेळी विषय समितीचे सभापती व जि.प.सदस्य उपस्थित होते. सद्या शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. बी-बियाणे व खताची विक्री जोमात सुरू आहे. मात्र या विक्रीवर नियंत्रण नाही. व्यापारी शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. २६६ रुपयांत विकला जाणारे युरिया खत वाटेल त्या भावाने विकला जात आहे.कृषी विभागाचे अधिकारी अनिभज्ञ कसे? असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जि.प.गटनेते गंगाधर परशुरामकर व किशोर तरोणे यांनी उपस्थित केला. चौदाव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी शासनाने परत घेतला. घर कर वसुलीसाठी उपयुक्त असलेल्या मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाचे संक्र मण वाढले. लॉकडाऊनमुळे वसुली होऊ शकली नाही. त्यामुळे सामान्य फंडात तुटपुंजी राशी असताना कोरोनाचे आव्हान पेलतांना ग्रामपंचायतींची चांगलीच दमछाक झाली. अनेक शाळांचे अद्याप सॅनिटायझेशन झाले नाही.अशा विपरीत परिस्थितीत हा भार ग्रामपंचायतींना पेलवणे शक्य नाही.यासाठी तरतुदींची उपाययोजना करण्याची मागणी परशुरामकर यांनी केली.गोंदिया जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ १४ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. अद्यापतरी कोरोनाचे संकट कायम आहे.या परिस्थितीत निवडणुका घेण्याची तिळमात्र शक्यता नाही. अनेक विकास कामे अडली आहेत. ती पूर्णत्वास जाण्याचे दृष्टीने ६ महिने मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे. असा ठराव मांडण्यात आला. यात अनेक सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. हा ठराव पारित करण्यात आला. यासह सभेत विविध विषयावर चर्चा झाली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदFarmerशेतकरी