शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

रेतीचा अवैध उपसा थांबवा

By admin | Updated: April 19, 2017 00:18 IST

सौंदड येथील चालू रेती घाटावर रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. हा प्रकार त्वरित थांबविण्यात यावा,

तहसीलदारांना निवेदन : २० ते २५ ट्रॅक्टर रेतीचा रोजच उपसा सौंदड :सौंदड येथील चालू रेती घाटावर रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. हा प्रकार त्वरित थांबविण्यात यावा, यासाठी शेतकऱ्यांनी सडक-अर्जुनीच्या तहसीलदारांना निवेदन दिले आहे. सौंदड येथील चालू रेती घाट कंट्राटदाराने २० लाखात विकत घेतले. मात्र सदर घाटामधून रेती साठा न नेता घाटापासून अर्धा किमी अंतरावरील घाटातून मोठ्या प्रमाणात दर्जेदार रेतीसाठा असल्याने तेथून नेले जात आहे. सदर कंत्राटदार दगडी चट्टान जवळील जागेतून जवळपास २० ते २५ ट्रॅक्टर रेतीचा रोजच उपसा करीत आहे. एका रॉयल्टीवर दहा ट्रिप रेती नेली जाते. त्यामुळे कंत्राटदाराने सीमा ओलांडल्याचे दिसून येत आहे. माहितीनुसार, दिलेल्या जागेतूनच सदर कंत्राटदार रेती नेवू शकतो. जेवढ्या ट्रीपची रॉयल्टी दिली जाते, तेवढीच नियमाने रेतीचा उपसा करणे अपेक्षित असते. तर नदी पात्रातून रेती उत्खननही जवळपास दोन फूट इतकेच खोल करावे लागते. मात्र सदर कंत्राटदाराने दिलेल्या जागेतून रेतीचा उपसा केलाच, पण ज्या ठिकाणी दर्जेदार साठा आहे तिथेपण हाथ साफ केले. जवळील शेतकरी जयपाल मारवाडे यांनी कंत्राटदारांना सदर जागेतून वाळू नेण्यास नकार दिला. यावर त्याने शेतकऱ्याशी अरेरावीपणाच्या भाषेत उत्तर दिले. हा सर्व प्रकार जवळपास तीन महिन्यांच्या पूर्वीपासून चुलबंद नदीमध्ये घडत आहेत. सदर कंत्राटदाराने या ठिकाणी प्रत्येक वर्षी उपसा करून नदी पात्र खोल केले आहे. नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन जवळपास पाच ते सात फुट ऐवढे खोल करीत आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याची जमीन प्रत्येक वर्षी नदी पात्रातून होत असलेल्या अवैध उत्खननाने खराब होत असल्याने शेतकरी संतापले आहेत. अधिकारी सहा ट्रॅक्टर पकडतात व एका ट्रॅक्टरला फाईन करतात, ही बाब तेवढीच खरी असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शासकीय मालमत्ता विक्रीला लागण्याची खंत व्यक्त होत आहे. अधिकाऱ्याने कंत्राटदारांना भोगवट दिलेल्या जागेतून गौण उत्खनन होत नसून दुसऱ्याच जागेतून होत आहे. तर जेवढे ट्रीप रेती कंत्राटदाराने नदी पात्रातून नियमाने रॉयल्टीनुसार नेणे गरजेचे असते, त्यापेक्षा दुप्पटतिप्पट रेती सदर ठिकाणातून नेली जात आहे. पहाटे या ठिकाणी ट्रॅक्टरांची रांग लागून जागाच भरते, असे दृश्य येथे दिसून येते. राजकीय वरदहस्त असल्याने लालचेच्या पोटी जास्त कमाईच्या भावनेने चुलबंद नदीची सदर कंत्राटदार वाट लावत असल्याची माहिती मारवाडे यांनी दिली. यात कंत्राटदाराला दिलेल्या घाटाचे मोजमाप करावे, दुसऱ्या जागेतून नेलेल्या वाळूचेही मोजमाप करावी तसेच दोषींवर त्वरित कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन जयपाल मारवाडे, गंगाधर मारवाडे, बबलू मारवाडे यांनी तहसीलदार विठ्ठलराव परडीकर यांना सर्व माहितीसह दिले आहे. तसेच कारवाईची मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)