शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते दुरुस्तीनंतरच रेतीघाट सुरु करा

By admin | Updated: March 5, 2016 02:03 IST

जवळील घाटकुरोडा वैनगंगा नदीच्या घाटावरून दरवर्षी दोन रेती घाट सुरू होते. पण यावर्षी महसूल विभागाने फक्त माता मंदिर रेती घाटाचा लिलाव केलेला आहे.

परिसरातील जनतेची मागणी : रस्त्यांची झाली दुर्गती, नागरिक झाले त्रस्त मुंडीकोटा : जवळील घाटकुरोडा वैनगंगा नदीच्या घाटावरून दरवर्षी दोन रेती घाट सुरू होते. पण यावर्षी महसूल विभागाने फक्त माता मंदिर रेती घाटाचा लिलाव केलेला आहे. तर दुसरे रेतीघाट सुरु होण्याच्या मार्गावर आहे. मात्र ते घाट सुरू करण्यापूर्वी रस्ते दुरुस्ती करा अशी मागणी घाटकुरोडा, घोगरा, पाटीलटोला व देव्हाडा व परिसरातील जनतेने केली आहे.एकच घाट सुरु असल्यामुळे घाटकुरोडा, घोगरा, पाटीलटोला व देव्हाळा (एलोरा पेपर मिल) या मार्गाने सरळ रेती भरलेले ट्रॅक नागपूरकडे धावत असतात. यामुळे रस्त्यांचे बेहाल झालेले दिसत आहेत. दररोज सकाळी व संध्याकाळी शेकडोंच्या घरात ट्रकमधून रेतीची जड वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या गावातील रस्ते जिर्ण झाले असून रस्त्यावरील डांबर व गिट्टी गेली कुठे तिचा पत्ताच नाही. परिणामी रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. रस्ता ऐकरी असल्यामुळे अनेक वाहनांना ट्रक जाईपर्यंत थांबून रहावे लागते.एवढेच नव्हे तर दुचाकी व पायदळ जाणाऱ्यांनाही खूप त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांनी विद्यार्थी तसेच रेल्वेचे प्रवासी मुंडीकोटा स्टेशनवर दररोज गोंदिया येथे सामान घेऊन जात असतात. या रस्त्यांनी तिरोडा आगाराची विद्यार्थ्यांसाठी स्कूल बस सुरु असून ती घोगरा गावापर्यंत येत असते व येथूनच परत जाते. तसेच तुमसर आगाराची तुमसर व तिरोडा व्हाया घाटकुरोडा ही प्रवासी बस दिवसांतून दोन वेळा ये-जा करीत असते. पण या रस्त्यांमुळे स्कूल तसेच प्रवासी बस बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या रस्त्यांनी रेतीची वाहतूक करणारे ट्रक जात असताना रस्त्यावरील धुळ उडून नागरिकांच्या नाकतोंडात शिरत असते.तसेच ज्यांची रस्त्याच्या शेजारी घरे आहेत त्यांच्या घरावर धुळ जमा होत असते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक गावातील व्यक्ती पहाटे फिरण्याकरिता जात असताना ट्रकमधून रेती उडून अनेकांच्या डोळ्यांत जात असल्याने त्यामुळे डोळ्यांचे आजार होत आहे. तरी संबंधित विभागाने पुर्वी रस्ते दुरुस्त करावे नंतर रेतीघाट सुरु करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.