गोंदिया-कोहमारा-अर्जुनी मोरगाव बस नियमित सुरू करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:22 IST2021-06-04T04:22:48+5:302021-06-04T04:22:48+5:30

बाराभाटी : दररोज व नियमित आणि वेळेवर ये-जा करणारी बस ही पूर्ण फेऱ्या करीत नाही. या प्रकारामुळे प्रवाशांची ...

Start regular Gondia-Kohmara-Arjuni Morgaon bus () | गोंदिया-कोहमारा-अर्जुनी मोरगाव बस नियमित सुरू करा ()

गोंदिया-कोहमारा-अर्जुनी मोरगाव बस नियमित सुरू करा ()

बाराभाटी :

दररोज व नियमित आणि वेळेवर ये-जा करणारी बस ही पूर्ण फेऱ्या करीत नाही. या प्रकारामुळे प्रवाशांची कोंडी झाली आहे. म्हणून ही बस रोजच वेळेवर व नियमित सोडा, अशी मागणी ग्रामीण भागातील प्रवाशांनी केली आहे.

बसच्या दैनंदिन फेऱ्या चार चार प्रमाणे आहेत; पण या बसचे चालक व वाहक हे कर्मचारी मुद्दाम टाळाटाळ व हलगर्जीपणा करीत असल्याचा प्रवाशांनी केला आहे. अनेक शासकीय, निमशासकीय कर्मचारी व प्रक्षिणार्थी यांची चालक वाहकांच्या धोरणामुळे त्रास सहन करावा लागत आहे. वेळापत्रकानुसार बस कधीच येत नाही. बस सुरू झाल्यापासून अनेक गावांतील नागरिक बसने प्रवास करतात; पण या मार्गाची बस ही एकही दिवस वेळेवर आली नाही. अनेक दूरचे नागरिक या बसने प्रवास करतात; पण त्यांना रात्र होण्याच्या आत घरी जाता येत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे.

......

कोट

या राज्य मार्गावरील बस कधीच वेळेवर धावत नाहीत, प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो, चालक, वाहक हे योग्य वागणूक देत नाही.

- प्रभाकर दहीकर,

प्रवासी व युवा सामाजिक कार्यकर्ते,

येरंडी-देवलगाव

Web Title: Start regular Gondia-Kohmara-Arjuni Morgaon bus ()