आता छोट्या वाहनांना स्कूल बस परवाना नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:45 PM2018-12-11T23:45:42+5:302018-12-11T23:46:25+5:30

अलीकडे स्कूल बसच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर परवाना नसलेल्या खासगी वाहनातून असुरक्षीतपणे विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. तर परवानाधारक वाहन चालक सुध्दा क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करीत आहे.

Small vehicles do not have a school bus license now | आता छोट्या वाहनांना स्कूल बस परवाना नाही

आता छोट्या वाहनांना स्कूल बस परवाना नाही

Next
ठळक मुद्देआरटीओ कार्यालयांना तोंडी सूचना : वाढते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना

दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : अलीकडे स्कूल बसच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर परवाना नसलेल्या खासगी वाहनातून असुरक्षीतपणे विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. तर परवानाधारक वाहन चालक सुध्दा क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करीत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान वाढत्या अपघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने सहा अधिक एक अशी आसन क्षमता असलेल्या वाहनांना स्कूल बस म्हणून परवाना देणे बंद करण्याचा निर्णय घेतला.
शहर आणि ग्रामीण भागात दोन हजारावर शासकीय व खासगी शाळा आहेत. घरापासून शाळेपर्यंत व शाळेपासून घरापर्यंत विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी काही शाळांनी स्वत:च्या स्कूल बसेसची व्यवस्था केली आहे. तर काही पालक परवानाधारक स्कूल व्हॅन इतर वाहनातून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवितात. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षीत वाहतूक करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने एक नियमवाली तयार केली आहे. त्या सुविधा असलेल्या परवानाधारक वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करता येते. मात्र काही परवानाधारक स्कूल बस व इतर वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवून वाहतूक केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षीतेचा प्रश्न निर्माण होतो. मात्र या प्रकाराकडे संबंधित विभागाचे सुध्दा दुर्लक्ष होते. शहर आणि ग्रामीण क्षेत्रात अवैधरित्या वाहतुकीमुळे विद्यार्थी वाहून नेणाऱ्या वाहनांना अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने ६ अधिक १ अशी आसन क्षमता असलेल्या वाहनांना परवाना देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सूचना सुध्दा सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आल्याची माहिती आहे.
काय आहे नियम?
नियमानुसार शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी त्या वाहन चालकाकडे मोटार वाहन अधिनियमानुसार वाहतुकीचा परवाना पाहिजे. प्रथमोपचार संच, अग्शिमन यंत्रणा, दप्तर व डब्बे ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, प्रशिक्षित चालक आदी नियम आहेत. मात्र या नियमांकडे ना पालक लक्ष देतात ना शाळा व्यवस्थापन त्यांची दखल घेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षीत वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो.

छोट्या वाहनांना यापुढे परवाना देवू नका अशा तोंडी सूचना वरिष्ठांकडून प्राप्त झाल्या आहे. त्या दिशेने ६ अधिक १ अशी वाहनक्षमता असणाऱ्या वाहनांना स्कुलचा बस परवाना देणे बंद करण्यात आले आहे.
-विजय चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया.

Web Title: Small vehicles do not have a school bus license now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.