शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

सहा शाळाबाह्य मुलांना केले दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 06:00 IST

एकही मूल शिक्षणापासून वंचीत राहू नये व त्या मुलांना गुणवत्तायुक्त शिक्षण मिळावे यासाठी शासनाने आरटीई कायद्यांतर्गत एकही मूल शाळाबाह्य राहू नये त्यासाठी तजविज केली. तसेच स्थानिक प्राधिकरणातील प्रत्येक पर्यवेक्षीय यंत्रणेची जबाबदारी शाळाबाह्य मुलांना शोधण्याची आहे हे नमूद केले.

ठळक मुद्देशिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले: शिक्षणासाठी वह्या व पुस्तके दिली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भीक मांगून पोट भरणाऱ्या व बालमजुरी करणाºया बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहे. त्यांतर्गत एकही बालक शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी शाळाबाह्य मुलांना शोधण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. तिरोडा तालुक्यातील परसवाडा केंद्रांतर्गत येणाऱ्या ग्राम अर्जुनी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत सहा शाळाबाह्य मुलांना दाखल कण्यात आले आहे.एकही मूल शिक्षणापासून वंचीत राहू नये व त्या मुलांना गुणवत्तायुक्त शिक्षण मिळावे यासाठी शासनाने आरटीई कायद्यांतर्गत एकही मूल शाळाबाह्य राहू नये त्यासाठी तजविज केली. तसेच स्थानिक प्राधिकरणातील प्रत्येक पर्यवेक्षीय यंत्रणेची जबाबदारी शाळाबाह्य मुलांना शोधण्याची आहे हे नमूद केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शाळांना शाळाबाह्य मुलांची माहिती मागीतली तेव्हा ती यादी शून्य दाखविली जाते. परंतु वास्तविकता वेगळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून शाळाबाह्य मूल शोध मोहीम राबविली जात आहे.कधीच शाळेत दाखल न झालेल्या शाळाबाह्य मुलांना शोधण्याचा उपक्रम जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यात कुडवा, रेल्वेस्थानक, काचेवानी, मुंडीकोटा, सौंदड येथे भीक मागणाºया, मांग-गारुडी, लोहार, फिरणारे नाथजोगी यांच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहेत. शाळाबाह्य मूलांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागासमोर ‘शाळाबाह्य मूल दाखवा एक हजार रूपये मिळवा’ असे जनजागृती करणारे फलकही लावले आहे. शिक्षकांनीच शाळाबाह्य मूल शोधण्यासाठी प्रयत्न केलेत. नाथजोग्यांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी त्यांना शाळेत दाखल करण्यात आले. रविंद्र श्रावण माळवे याला सातवीत, अंकुश श्रावण माळवे याला पाचवीत, सुरेखा नशीब शिंदे ही ११ वर्षाची आहे. चांदणी हंसराज बाभूळकर दुसरीत, काजल प्रकाश माळवे तिसरीत तर साजन हंसराज बाभूळकर याला पहिलीत दाखल करण्यात आले. त्यांना वह्या व पुस्तका भेट देण्यात आल्यात.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी