साहेब,रंगाचेही पैसे निघाले नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:00 AM2020-08-13T05:00:00+5:302020-08-13T05:00:50+5:30

साधारणत: दहा हजार रुपये किमतीच्या शंभर मूर्त्या तयार करताना किमान तीन हजार रुपये केवळ रंगासाठी खर्च येतो. त्यावर महिनाभरापासून मूर्तिसाठी माती तयार करणे तिला मूर्त रुप देणे यासाठी भरपूर परिश्रम घ्यावे लागते. पूर्ण मूर्त्या विकल्या तरी ग्रामीण भागात फारसा लाभ मिळत नाही. त्यावर यंदा मूर्त्या विक्री झाल्या नाही त्यामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली.

Sir, not even the color money has gone ... | साहेब,रंगाचेही पैसे निघाले नाही...

साहेब,रंगाचेही पैसे निघाले नाही...

Next
ठळक मुद्देमूर्तिकारांनी मांडली व्यथा : कोरोनाचा बसला फटका

विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : कोरोनामुळे आधीच बेरोजगारी संकट असतान ऐन जन्माष्टमीच्या दिवशी सालेकसा शहरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. याचा कान्होबाच्या मूर्त्यांची विक्री करणाऱ्या मूर्तिकारांना फटका बसला. दिवसभरात दरवर्षीच्या तुलनेत यंदा पाच टक्के सुध्दा मूर्त्या विकल्या नाहीत. यामुळे येथील कुंभार समाज चांगलाच आर्थिक अडचणीत आला. यंदा मूर्ती रंगविण्यासाठी लागलेला रंगाचा खर्च सुद्धा निघाला नाही. असे पाणावलेल्या डोळ्यांनी मूर्तिकारांनी सांगितले.
सालेकसा शहरात दहा ते बारा कुंभार समाजाच्या कुटुंबाचे वास्तव्य आहे. आपल्या मुला-बाळांसह विविध सण उत्सवच्या प्रसंगानुरुप मूर्त्या घडविण्याचे काम ते करतात. तसेच इतर वेळी माठ व इतर जीवनोपयोगी वस्तू तयार करतात. यातील काही माल घरुन विक्री होते तर काही मालाच्या विक्रीसाठी बाजारात दुकाने लावतात. तर काही लोक गावागावात भ्रमण करीत आपल्या मालाची विक्री करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. यंदा कोरोनामुळे कुंभार बांधवाच्या व्यवसायावर सुद्धा मोठा परिणाम झाला आहे. कुंभाराने तयार केलेल्या वस्तुंच्या विक्रीत विक्रमी घट झाली आहे. अशात कुंभार समाजबांधावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. श्रद्धेने दरवर्षी जन्माष्टमी निमित्त कान्होबाची घरी स्थापना करणारे भाविक यंदाही आपल्या घरी कान्होबाची स्थापना करतील या अपेक्षेने कुंभार समाज बांधवानी कुणी दोनशे तर कुणी चारशे मूर्त्या तयार केल्या. मात्र मूर्त्या विकण्यासाठी गावात फिरताच आले नाही. त्यामुळे मूर्ती विक्रीचे प्रमाण आधीच निम्यावर आले.
मूर्तिकार जन्माष्टमीच्या दिवशी एक दिवस आधीपासून गांधी चौकात कान्होबाच्या मूर्त्या विक्री करण्यासाठी बसतात. यंदाही मूर्ती विकायला बसले. परंतु दुदैव असे की ऐन जन्माष्टमीच्या दिवशीच सालेकसात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आणि सालेकसात संपूर्ण बाजारपेठ बंद झाली. जनता कर्फ्यूमुळे बाहेर गावातील भाविक मूर्ती घेण्यासाठी सालेकसा शहरात आलेच नाही. सालेकसा येथील लोकही घराबहेर पडले नाही.
शहरात सर्वत्र शुकशुकाट असताना मूर्तिकार आपल्या कान्होबाच्या मूर्त्या विक्रीसाठी चौकात ठेवून दिवसभर ग्राहकांची वाट बघत राहीले. परंतु मूर्ती घेणारे ग्राहक आले नाही. त्यामुळे मूर्ती विकणाºया प्रत्येक मूर्तिकारांच्या चेहºयावर नैराश्य दिसून येत होते.

३० टक्के खर्च रंगासाठी
श्यामबाई वघाडे नावाच्या महिला मूर्तिकारासोबत लोकमत प्रतिनिधीने संवाद साधला असता साधारणत: दहा हजार रुपये किमतीच्या शंभर मूर्त्या तयार करताना किमान तीन हजार रुपये केवळ रंगासाठी खर्च येतो. त्यावर महिनाभरापासून मूर्तिसाठी माती तयार करणे तिला मूर्त रुप देणे यासाठी भरपूर परिश्रम घ्यावे लागते. पूर्ण मूर्त्या विकल्या तरी ग्रामीण भागात फारसा लाभ मिळत नाही. त्यावर यंदा मूर्त्या विक्री झाल्या नाही त्यामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.

Web Title: Sir, not even the color money has gone ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.