Shanda-road arjuni road becomes Khaddepur | शेंडा-सडक अर्जुनी मार्ग झाला खड्डेपूर

शेंडा-सडक अर्जुनी मार्ग झाला खड्डेपूर

ठळक मुद्देदोन वर्षापासून गिट्टी व मुरुमाचेच काम : मुरुम खोदकामही संशयाच्या भोवऱ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा ते सडक अर्जुनी या १४ कि.मी.च्या मार्गावर खड्डेच खड्डे तयार झाले आहे. तर रस्त्यावरील गिट्टी पूर्णपणे बाहेर निघाली असल्याने या मार्गावरुन वाहन चालवितांना वाहन चालक व शाळेकरी विद्यार्थ्यांचा चांगलीच कसरत करावी लागत आहे. या खड्डेयुक्त रस्त्यामुळे हा मार्ग खड्डेपूर झाल्याचे चित्र असून त्यावरुन ये-जा करणाऱ्यांना चांगलाच मनस्ताप आणि वेदना सहन कराव्या लागत आहेत. मात्र याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने समस्या कायम आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा ते सडक अर्जुनी मार्गावर नवीन रस्त्याचे बांधकाम मागील दोन वर्षापासून सुरु आहे. शेंडा ते सडक अर्जुनीचे अंतर १४ कि.मी.चे आहे. त्यापैकी केवळ ७ कि.मी. रस्त्याचे काम सुरु आहे. एकाच रस्त्याला वारंवार खोदून गिट्टी व मुरुमाचा थर दिला जात असल्याने बांधकाम कोणत्या पद्धतीने केले जात आहे हे कळायला मार्ग नाही.
या मार्गावरुन ये-जा करणाºया गावकºयांना व वाहन चालकांना सदर रस्ता डोकेदुखीचा ठरत आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी शासनाकडून २६ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आहे. नवीन रस्ता बांधकाम करताना रहदारीसाठी मार्ग मोकळा असणे गरजेचे आहे. परंतु तसे न करता रस्ता पुर्णत: खोदण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. एकाच ठिकाणी तिनदा खोदकाम करणे त्यावर गिट्टी मुरुम टाकण्याचे काम सुरू आहे. दोन वर्षात चार कि.मी.रस्ताही पूर्ण तयार करण्यात आला नाही. शेंडा ते सडक अर्जुनी हा चोवीस तास रहदारीचा मार्ग आहे. वाहन चालकांना रस्त्याच्या दुर्दशमुळे मोठी कसरत करावी लागते. ठिकठिकाणी गिट्टी उखडली असल्याने वाहन कुठून न्यावे असा प्रश्न पडतो. या रस्त्यावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली असता त्यांनी बोलणे टाळले.

रॉयल्टीपेक्षा अधिक खोदकाम
रेंगेपार पहाडीच्या पायथ्याशी याच कामासाठी मुरुम खोदकाम सुरु आहे. जेसीबीने खोदकाम व चार पाच ट्रॅक्टरने मुरुम वाहतूक सुरु असताना मोक्यावर जाऊन एका कंत्राटदाराला विचारले असता त्यांनी महसूल विभागाकडून मुरुम खोदकामाची पाचशे ब्रासची मंजुरी घेतल्याचे सांगितले. परंतु प्रत्यक्षात मात्र यापेक्षा अधिक खोदकाम करण्यात आल्याचे दिसून येते. मात्र याकडे महसूल विभागाने सुध्दा याकडे डोळेझाक केल्याचे चित्र आहे.
दोन वर्षांत केवळ सात कि.मी.चा रस्ता
शेंडा ते सडक अर्जुनी या १४ कि.मी.च्या रस्त्याचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र ते बांधकाम अद्यापही पूर्ण झाले नाही. दोन वर्षांत केवळ सात कि.मी.च्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पण याची लोकप्रतिनिधींनी सुध्दा अद्यापही दखल घेतली नाही.

खराब रस्त्यामुळे दहा कि.मी.चा फेरा
सडक अर्जुनी ते शेंडा या मार्गाची अंत्यत दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे. तर एखाद्या गंभीर रुग्णाला या मार्गावरुन रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केल्यास तो रुग्णालयात सुखरुप पोहचेल किंवा नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.त्यामुळे अनेकजण या मार्गाने न जाता दहा कि.मी.चा फेरा असलेल्या दुसºया मार्गाने जात आहे. या रस्ता बांधकामामुळे रेंगेपारवासीय सर्वाधिक त्रस्त झाले आहेत.

Web Title: Shanda-road arjuni road becomes Khaddepur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.