शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तीव्र पाणीटंचाईची चाहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:15 IST

मागील खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे अंतिम टप्प्यात धानपिकाला तलाव, बोड्या, नदी, नाल्याचे पाणी द्यावे लागले. येथील जलसाठा घटला. त्यानंतर डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून झपाट्याने जलपातळी घटली.

ठळक मुद्देचामोर्शी तालुका : जलपातळी घटल्याने नळ योजनांवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : मागील खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे अंतिम टप्प्यात धानपिकाला तलाव, बोड्या, नदी, नाल्याचे पाणी द्यावे लागले. येथील जलसाठा घटला. त्यानंतर डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून झपाट्याने जलपातळी घटली. याचा परिणाम आता दिसून येत आहे. तालुक्यातील नदी काठालगतच्या अनेक गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कडक उन्हाळ्यात ही समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.दरवर्षी एप्रिल महिन्यापासून तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण व्हायची. परंतु यंदा मार्च महिन्यापासूनच टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. मार्च महिन्यातच लहान नाले, तलाव आटायला सुरूवात झाली. जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीतील जलपातळी झपाट्याने घटत आहे. चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील पाच ते सहा गावांना पाणीटंचाईच्या झळा आतापासूनच बसत आहेत. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात ही समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.चामोर्शी जवळील चिचडोह बॅरेज बांधून पाणी अडविण्यात आल्यामुळे बॅरेजच्या उतार भागात असलेल्या गावांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या नळ योजनांना मुबलक पाणी पुरवठा होईल, अशी शक्यता दिसून येत नाही. आतापासूनच या नळ योजनांची जलपातही अतिशय खाली गेली आहे. भेंडाळा, वाघोलीसह परिसरातील तीन ते चार गावांमध्ये पाणीपुरवठा करणाºया नळ योजनांच्या विहिरीतील जलपातळी खाली गेल्याने गावात केल्या जाणाºया पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुन्हा उन्हाळ्याची दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे अशा स्थितीत या भागात पाणीटंचाई तीव्र होईल, अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. बॅरेजच्या खालील भागात असलेल्या नदीपात्रात पाणी शिल्लक नाही. परिणामी या भागातील नळ योजनांद्वारे एक ते दोन दिवस आड पाणीपुरवठा करावा लागत आहे.विशेष म्हणजे गावातील अनेक विहिरी व हातपंपाची पातळी अत्यंत खाली गेली आहे. यातील पाणीपातळी पुन्हा खाली गेल्यास नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे. या भागातील भाजीपाला तसेच उन्हाळी धानपिकावरही परिणाम होत आहे. त्यामुळे नव्यानेच निर्माण झालेल्या चिचडोह बॅरेजमधील पाणी कडक उन्हाळ्यात नदीच्या उतार भागात सोडावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई