शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनीत पाण्याची भीषण टंचाई

By admin | Updated: March 6, 2016 01:37 IST

गोंदिया तालुक्यातील अर्जुनी ग्राम येथे भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची वेळ आली आहे.

२२ विहिरी कोरड्या : पाणीपुरवठा योजना झाली ठप्पविजेंद्र मेश्राम ल्ल खातियागोंदिया तालुक्यातील अर्जुनी ग्राम येथे भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची वेळ आली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच गावातील २२ विहीरी आटून गेल्या आहेत. उन्हाळ्याला जेमतेम सुरूवात झाली असताना ही स्थिती आहे तर पुढे काय होणार? अशी चिंता गावकऱ्यांना सतावत आहे.गावात ६५००० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे. २६ फेब्रुवारीला ११ महिन्याचे ६६ हजार रुपयांचे विद्युत बिल थकबाकी असल्यामुळे टाकीचे कनेक्शन काढण्यात आले. त्यामुळे आता २६ फेब्रुवारीपासून लोकांना पाणी टाकीच्या माध्यमातून पाणी मिळत नाही. यामुळे गावकरी पाण्यासाठी त्राही-त्राही होत आहेत. आपल्या या समस्येचे त्वरीत निराकरण करण्याची मागणी अर्जुनीच्या गावकऱ्यांनी केली आहे. काही ग्रामीण लोकांच्या म्हणण्यानुसार जवळील परिसरातील शेतांमध्ये करण्यात आलेल्या बोअरमुळे गावातील विहीरींची भूजल पातळी खालावली आहे. ही समस्या क्षेत्रातील जि.प.सदस्य विजय सोनारे यांना सांगितल्यानंतर त्यांनी ४ मार्चला स्वत: येऊन यांनी गावातील भिषण पाण्याची समस्या जाणून घेतली. सुकलेल्या विहीरी पाहिल्या. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष रजनी नागपुरे, उपसरपंच सूरजलाल खोटेले उपस्थित होते. या समस्येवर तोडगा काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पाण्याची समस्या त्वरीत निकाली काढली नाही तर भारतीय कॉम्युनिष्ट पार्टीतर्फे ११ मार्चपासून उपोषणाला बसण्याचा इशारा नरेंद्र गजभिये यांनी दिला.