शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

३६ हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 9:39 PM

राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ३६ हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात आला आहे. त्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली.

ठळक मुद्देशेकडो शेतकरी प्रतीक्षेत : अंतिम आकडा गुलदस्त्यातच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ३६ हजार शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यात आला आहे. त्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली. मात्र यानंतरही कर्जमाफीस पात्र ठरलेले शेकडो शेतकरी प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस प्राथमिक यादीत सुरूवातीला जिल्ह्यातील ७६ हजार शेतकरी पात्र ठरले होते. चावडी वाचन आणि अर्जाच्या छाननीनंतर यातील मोठ्या प्रमाणावर अर्ज अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारने जिल्ह्यातील ४६ हजार ६८७ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरल्याचे जाहीर केले होते.यापैकी आत्तापर्यंत एकूण ३६ हजार ४७६ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात आला. यामध्ये २३ हजार ६२७ थकीत कर्जदार व १२ हजार ८४९ नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. थकीत बाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यावर ७७ कोटी ७० लाख रुपये व नियमित कजफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर १८ कोटी २६ लाख असे एकूण ९५ कोटी ९७ लाख रुपये जमा करण्यात आले.कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवर आहे.तर राष्ट्रीयकृत बँका फार माघारल्याचे चित्र आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी अजूनही १० हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांची बँकामध्ये पायपीट सुरूच असल्याचे चित्र आहे.त्या शेतकऱ्यांचे कायकर्जमाफीस पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील हजारावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली होती. मात्र आधार क्रमांक जुळत नसल्याचे व त्रुट्या आढळल्याचे सांगत या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली कर्जमाफीची रक्कम शासनाला परत पाठविण्यात आली. मात्र या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही. हे शासनाने अद्यापही स्पष्ट केलेले नाही त्यामुळे संभ्रम कायम आहे.