शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

दुसरी पत्नीही पोटगीस पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2016 01:47 IST

दुसरी पत्नी सुध्दा पोटगी मिळण्यास पात्र आहे. असा निर्वाळा देत अर्जुनी-मोरगाव न्यायालयाने येरंडी-देवी येथील ममीता दुधराम हत्तीमारे या महिलेला पोटगी मंजूर केली आहे.

मंजुरीचा आदेश : अर्जुनी न्यायालयाचा निर्णयअर्जुनी-मोरगाव : दुसरी पत्नी सुध्दा पोटगी मिळण्यास पात्र आहे. असा निर्वाळा देत अर्जुनी-मोरगाव न्यायालयाने येरंडी-देवी येथील ममीता दुधराम हत्तीमारे या महिलेला पोटगी मंजूर केली आहे. सडक-अर्जुनी तालुक्याच्या वडेगाव येथील दुधराम गोपाळा हत्तीमारे याने ममीताशी २३ मार्च २००३ रोजी येरंडी/देवी येथे विवाह झाला. ती घरी नांदण्यासाठी गेली तेव्हा त्याचे यापूर्वी पुष्पा नामक महिलेशी लग्न झाल्याचे कळले. यातून ममीताला १४जून २००४ रोजी अपत्य झाले. २६ एप्रिल २०१२ रोजी पहिली पत्नी व दुधरामने तिला बेदम मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. याची डुग्गीपार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तेव्हापासून ममीता ही माहेरीच राहत आहे. २२ जानेवारी २०१३ रोजी न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले.ममीताचे विधिज्ञांनी न्यायालयात युक्तीवाद करतांना दूधरामने त्याचे पहिले लग्न लपवून ममीताशी दुसरे लग्न केले. ते तिला सासरी गेल्यानंतर कळले. तिला उपजीविकेकरिता काहीही दिले नाही. तिला उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत्र नाही. दुधरामची पुरेशी ऐपत असून तो पोटगी देण्यास समर्थ असल्याचे सांगितले. दुधरामचे विधिज्ञांनी न्यायालयात युक्तीवाद करतांना ममीता ही कायदेशीर पत्नी नसल्याने तिला पोटगी मागण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या बाजू समजून घेतल्या. सविताबेन सोमाभाई भाटिया विरूध्द गुजरात सरकार व इतर एआयआर २००५ सर्वोच्च न्यायालय १८०९ या निर्णय विधीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केलेले अभिक्षण लक्षात घेतले. अर्जदाराचे विधिज्ञांनी बादशाह विरूध्द उर्मिला बादशहा गोडसे आणि इतर या निर्णय विधीचा आधार घेतला. यात पत्नीने त्याचा पहिला विवाह लपवून दुसरा विवाह केला असल्यास दुसरी पत्नी पोटगी मागण्यास पात्र असल्याचे म्हटले आहे. उभयपक्ष शेतकरी कुटूंबातील आहे. सद्य परिस्थितीतील वाढती महागाई व आवश्यक मूलभूत गरजांचा विचार करता ममीतास ८०० रुपये दरमहा पोटगी अर्ज दाखल झालेल्या तारखेपासून देण्यात यावे तसेच १ हजार रुपये अर्जाचा खर्च द्यावा असा आदेश अर्जुनी-मोरगावचे न्यायदंडाधिकारी भ.म.कारलेकर यांनी १४ जानेवारी रोजी दिले. ममीतातर्फे अ‍ॅड. पोमेश रामटेके तर दुधरामच्या वतीने अ‍ॅड. कापगते यांनी युक्तीवाद केला. (तालुका प्रतिनिधी)