शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बसला अपघात

By admin | Updated: September 20, 2014 01:39 IST

गोंदियातील सेंट झेवियर्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना

सेंट झेवियर्सचे १३ विद्यार्थी जखमी : आमगाव-गोंदिया मार्गावरील घटना आमगाव : गोंदियातील सेंट झेवियर्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना आमगावरून गोंदियाला आणत असलेल्या स्कूल बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्यावरून खाली उतरून झुडपात शिरली. यात १३ विद्यार्थी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गोंदिया येथे दाखल करण्यात आले.येथील सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विविध ठिकाणाच्या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणून परत घरी पोहोचवून देण्यासाठी शाळेने बससेवा सुरू केली. आहे. यात आमगाव तालुक्यातील अनेक विद्यार्थी दररोज बसने येतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी एक स्कूल (एमएच ३५/के-६९३) आमगाववरून सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन निघाली. गोंदिया-आमगाव मार्गावरील दहेगाव वळणावरून ही बस जात असताना बसेसची गती नियंत्रणात नसल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्यालगत शेतात शिरून अपघात झाला. या १३ विद्यार्थी जखमी झाले. त्या विद्यार्थ्यांना तातडीने गोंदिया येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु पालकांनी व नागरिकांनी शाळा व्यवस्थापनाकडे जखमी विद्यार्थ्यांची चौकशी करण्यासाठी वारंवार दूरध्वनीवरून संपर्क केल्यावर उत्तर मिळत नसल्याचा अनुभव अनेकांना आला. वेगाने चालणाऱ्या बसेसमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालक व शाळा व्यवस्थापनाने याची योग्य दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे काही शाळांच्या स्कूल बसेसला परिवहन विभागाची परवानगी सुद्धा नसल्याचे बोलले जाते. (शहर प्रतिनिधी)