शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

योजना उठली शेतकऱ्यांच्या जीवावर

By admin | Updated: February 5, 2016 01:21 IST

परिसरातील शेतीला सिंचनाची व्यवस्था निर्माण करुन देण्यासाठी शासनाच्या नियंत्रणाखाली रजेगाव -काटी उपसा...

रजेगाव-काटी उपसा सिंचन योजना : न्यायासाठी संघर्ष समितीची धडपड रावणवाडी : परिसरातील शेतीला सिंचनाची व्यवस्था निर्माण करुन देण्यासाठी शासनाच्या नियंत्रणाखाली रजेगाव -काटी उपसा सिंचन योजना अनेक वर्षापासून कार्यान्वित होत आहे. या योजनेचे क्रियान्वयन मध्यम प्रकल्प पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून होत आहे. परंतु या विभागाने केंद्र आणि राज्य शासनाचा ठराविक नियम कायद्याचे तंतोतंत पालन न करताच जमीन संपादन प्रक्रिया कशी पार पाडली, अशा प्रश्न किसान संघर्ष समितीद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. योजना साकारल्यास परिसरात हरितक्रांती येणार असे स्वप्न दाखविण्यात आले. योजनेसाठी शेतकऱ्यांच्या मालकीतील शेती कालव्याकरिता घेण्यासाठी सारे नियम धाब्यावर बसवत सक्तीने शेतकऱ्यांकडून जमिनी बळकावल्या आहेत. प्रकल्पासाठी लागणारी जमीन अमानुषतेचा कळस गाठत जबरदस्तीने शेतकऱ्याकडून घेतली आहे. हे जर कायद्याचे राज्य आहे असे म्हणत असू तर मग जमीनी संपादित करत असताना कायदे कुठे जातात. प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी कवडीमोल भावात जाणार त्या शेतकऱ्यांचा विरोध असणे साहजिकच आहे. परंतु या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध का आहे, नेमका कशासाठी आणि कोणत्या गोष्टीला आहे, शेतकऱ्यांचे नेमके म्हणणे काय आहे अशा प्रश्नांची समाधानकारक उत्तरे सरकारने दिली पाहिजे.पुनर्वसन आणि मोबदल्या बाबदचा प्रामाणिकपणा दाखवला तर शेतकऱ्यांचा विरोध बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. ही योजना एकच असून शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दोन प्रकारे देण्यात येत आहे. एका शेतकऱ्याला अवाढव्य तर लागूनच असलेल्या शेतकऱ्याला अत्यल्प तर लगतच असलेल्या शेतकऱ्याला अत्यल्प मोबदला दिले जात असल्यामुळे शेतकऱ्यांत कमालीचा असंतोष खदखदत आहे. परंतु शेतकऱ्यांचे हित पाहण्यापेक्षा लोकसेवकांच्या हिताला अधिक लक्ष दिले जात आहे, असे किसान संघर्ष समितीचे म्हणणे आहे. योजनेत समाविष्ट सर्वच शेतकऱ्यांना एक सारखा समान मोबदला दिला जावा अशा मागणीला जोर आला आहे. गोरगरीब नागरिकांनी शासनाच्या वितभर जागेवर उदरनिर्वाहा करीता अतिक्रमण केले तर लगेच प्रशासनाचे आला अधिकारी त्यावर त्वरित कार्यवाही करुन त्यांना अपमानित करुन कोर्टात खेचण्याचा धमक्या देतात. एवढेच नाही तर केवळ वित भर जागे करिता त्यांना शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या सतत झिझवाव्या लागतात. मात्र शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या पाटबंधारे विभागाच्या अमलदारांनी गैर कृत्य करीत शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे अतोनात नुकसान केले आहे. त्यांच्या या कृत्याला हलगर्जीपणा म्हणावा की, प्रशासनाच्या कामकाजाचा एक नमुना अशा प्रश्न बाधित शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.योजनेच्या सुरुवातीच्या काळापासूनच पाटबंधारे विभागाने खोटारडी चुकीची माहिती एकत्रित करुन संबंधित विभागाला पुरविली. प्राप्त झालेली माहिती खरी आहे की, पूर्ण चुकीची याबाबत काहीच पडताळणी न करताच संबंधित विभागाने भुसंपादनाची प्रक्रिया पार पाडली. त्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. कायद्याबाबत अनभिज्ञ असणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांच्या कायदेशिर हक्काला कसल्याच प्रकारचे महत्व दिलेच नाही. संपादनाची प्रक्रिया पूर्णत: नियमबाह्य झाली असल्यामुळे वर्तमान राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिर पणे उभे आहे अशा घोषणा केल्या जात आहेत. त्यामुळे घडलेल्या संपूर्ण गैर कृत्याची माहिती शासनासमक्ष न्याय प्राप्तीसाठी तक्रार किसान संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे. (वार्ताहर)