शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

वधू मिळविण्यासाठी वरांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 06:00 IST

पुरूषप्रधान समाजात उपवराचे पुर्वी पारडे जड असायचे. हुंडा मिळाला नाही किंवा मानपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल असायची. परंतु आता बदलत्या परिस्थितीत मुलींची संख्या घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. पुर्वी मुलाच्या शोधासाठी मुलीचे पालक मुलगा मिळेल का म्हणून महिना-महिना नातेवाईकाच्या घरी फिरायचे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे.

ठळक मुद्देव्यथा शेतकरी कुटुंबांची : शासकीय नोकरदारांनाच वधुपित्याची पहिली पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामीण भागात लग्नाकरिता सर्वत्र मुली पाहण्याची शोध मोहीम सुरू आहे. त्यानिमित्ताने गावागावात मंडई व नाटकाचे आयोजन केले जात आहे. मात्र आता मुलींना भूमिहीन शेतमजूर मुलांना नापसंती सुरू आहे. मुलाकडे शेती पाहिजे मात्र मुलगा शेतकरी नको आहे. त्यामुळे पालकवर्गाची मुली- मुलांसाठी धावपळ सुरू आहे. परिणामत: पालकांकडून विनवणी केली जात आहे की, फक्त मुलगी द्या, लग्न आम्हीच करू हे बोलके चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहेत.पुरूषप्रधान समाजात उपवराचे पुर्वी पारडे जड असायचे. हुंडा मिळाला नाही किंवा मानपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल असायची. परंतु आता बदलत्या परिस्थितीत मुलींची संख्या घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. पुर्वी मुलाच्या शोधासाठी मुलीचे पालक मुलगा मिळेल का म्हणून महिना-महिना नातेवाईकाच्या घरी फिरायचे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. खर्च आम्हीच करू म्हणून मुलाचे पालक मुलीसाठी वनवन भटकत आहेत.निसर्गाच्या अवकृपेने व शासनाच्या चुकीच्या धोरणाममुळे शेतकऱ्यावर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक पित्याला वाटते की, आपली मुलगी चांगल्या घरी नांदावी. सध्या ग्रामीण भागातील मुलीच्या पित्याची नजर शहरी भागातील मुलाकडे वळली आहे. श्रीमंत असो की गरीब असो शेतकरी मुलाला मुलगी देण्यास मुलीचे पिता नकार देत आहेत. त्यामुळे प्रेमप्रकरणात वाढ होत आहे. ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या विवाहोच्छूक मुलांना मुलगी मिळणे कठीण झाले आहे. पुर्वी मुलाचे लग्न लाखो रूपयाची उधळण करून मोठ्या थाटामाटात करीत होते. मात्र आता शेतीच्या वाढत्या कर्जामुळे अल्प खर्चातच साध्या पद्धतीने लग्न केले जात आहे. मुलगी मिळणे कठीण झाल्यामुळे बऱ्याच मुलांनी हुंडा दिल्याचे समजत आहे. मुलगी दाखवून व लग्न जोडून देणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.शेतकरी नवरा नको, पण शेती हवीचशेतकरी मुलांना कोणीही मुलगी देण्यास तयार नाहीत. सर्वात प्रथम सरकारी नोकरीवर असलेल्या मुलांना प्राधान्य दिले जात आहे. परंतू काही ठिकाणी सध्या नोकरी सोबत शेती आहे का? असाही प्रश्न पुढे येत आहेत. शेतकरी नवरा नको पण शेती हवीच, असा प्रकार पुढे येत आहे.मुलीच्या शोधात वाढतेय वयपरिसरातील अनेक तरूण लग्न करण्याकरिता पुढे आले असता मुलगी मिळत नसल्यामुळे त्यांचे वय ३५ ते ४० वर्ष होत आहे. काही मुलांनी तर तुम्हाला पैसे पाहिजे असतील आम्ही द्यायला तयार आहोत. लग्नाचा संपूर्ण खर्चही आम्हीच करू फक्त मुलगी द्या, असाही निर्णय घेताना दिसत आहेत.