शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

युवा वर्गासाठी ‘रोडमॅप करिअरचा, पासवर्ड यशाचा’

By admin | Updated: November 3, 2014 23:28 IST

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. मात्र सूट, सवलत, अनुदान व शिष्यवृत्ती आदी योजनांबाबत विद्यार्थ्यांना माहितीच मिळत नाही. केवळ माहितीअभावी कुणाची

गोंदिया : गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. मात्र सूट, सवलत, अनुदान व शिष्यवृत्ती आदी योजनांबाबत विद्यार्थ्यांना माहितीच मिळत नाही. केवळ माहितीअभावी कुणाची संधी हुकली किंवा हिरावली जावू नये म्हणून ‘रोडमॅप करिअरचा... पासवर्ड यशाचा’ या नावाची माहिती पुस्तिका लोकमत युवा नेक्स्टच्या वतीने प्रकाशित करण्यात आली. सदर पुस्तिकेचे प्रकाशन सोमवारी (दि.३) दुपारी ३ वाजता लोकमत जिल्हा कार्यालय गोंदिया येथे मान्यवरांच्या हस्ते एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आले.याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, राधाबाई नर्सिंग महाविद्यालयाचे संचालक विजय बाहेकर, सुवर्ण व्यापारी गगन अग्रवाल, आकृती अ‍ॅडव्हर्टाईजमेंटचे संचालक प्रमोद गुडधे, नाट्य कलावंत प्रा.देवा बोरकर, लोकमतचे कार्यालय प्रमुख प्रशांत मिश्रा, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, देवानंद शहारे, संतोष शर्मा, लोकमत युवा नेक्स्टच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत उपस्थित होते.स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देणाऱ्या अनेक योजना आहेत. पण त्याची माहितीच मिळत नाही. त्यामुळे उपलब्ध संधींचा लाभ घेता येत नाही. असे होवू नये म्हणून लोकमत युवा नेक्स्टने एक पाऊल पुढे टाकले आहे. या पुस्तिकेत पब्लिक रिलेशन, गेम डिझायनर, निसर्ग संगोपणात करिअर, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, इको आर्ट्सचे गोळे, आॅन हेअर, आॅटोमोबॉईल डिझायनिंग, गेम डिझायनर, मरीन इंजिनिअरिंग, ब्युटी पार्लर्स, युपीएससी, एमपीएसी आदींची माहिती या पुस्तिकेत आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या तरूण-तरूणींनी संग्रही ठेवण्यासारखी आणि उपयुक्त अशी ही पुस्तिका आहे. सदर पुस्तिका हवी असेल तर ती सहजच मिळू शकेल. त्यासाठी लोकमत युवा नेक्स्टचे सदस्य असणे आवश्यक आहे. लोकमत युवा नेक्स्टची सदस्यता नोंदणी सुरू असून युवा वर्गाने आपली नोंदणी करून घ्यावी. या पुस्तिका प्रकाशनप्रसंगी लोकमत कार्यालयातील राजीव फुंडे, पंकज गहेरवार, राजेश नक्षिणे, संगीता बन्सोडे, संतोष बिलोने आदी उपस्थिथ होते. सदस्यता नोंदणीसाठी किंवा अधिक माहितीसाठी लोकमत जिल्हा कार्यालय गोंदिया (०७१८२-२३०५०७, ९८८१०११८२१) येथे संपर्क साधावा. (प्रतिनिधी)