शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी रखडले शंभुटोला रस्त्याचे काम

By admin | Updated: March 19, 2015 01:11 IST

शंभुटोला ते ननसरी व पुढे जाणाऱ्या असा एकूण १३ किलोमीटरचा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजुर झाला. या कामाकरिता जवळपास ६ कोटी रुपये मंजूर झाले.

आमगाव : शंभुटोला ते ननसरी व पुढे जाणाऱ्या असा एकूण १३ किलोमीटरचा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजुर झाला. या कामाकरिता जवळपास ६ कोटी रुपये मंजूर झाले. मात्र सध्या निधी नसल्यामुळे शंभुटोला रस्ता रखडला. शासनाने निधीकरीता विलंब लावल्याने प्रवाशांना मात्र मोठ्या यातना भोगाव्या लागत आहेत. शंभुटोला, महारीटोला, सरकारटोला, ननसरी व पुढे मुंडीपार या १३ किमीच्या मार्गावर अनेक वर्षापासून प्रवाशांना यातना सहन कराव्या लागत आहेत. जिल्हा परिषद बांधकाम विभाग गोंदिया यांच्याकडे निधीची कमतरता आहे. त्यामुळे माजी केंद्रीय उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने सदर रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला. मात्र या मार्गाला केंद्राकडून मिळालेला निधी राज्य शासनाने न दिल्यामुळे कंत्राटदारांनी कामाची गती मंदावली आहे. फक्त पहिला हप्ता मिळाला, दुसरा हप्ता न मिळाल्यामुळे काम बंद आहे. या मार्गावरील नाली बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहेत. मार्गावर गिट्टी मोठ्या प्रमाणात पडली आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीचा प्रवास या मार्गावर होऊ शकत नाही. लांब फेरा होऊन आमगावला अनेक नागरिक विद्यार्थी येतात. चार किमीकरिता दहा किमी फेरा मारून या मार्गाचा प्रवास अनेकांचा सुरू आहे. निधी राज्य शासनानी त्वरीत देणे गरजेचे आहे. तब्बल तीन महिन्यापासून हे काम रखडले आहे. (तालुका प्रतिनिधी)