शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

तालुका मुख्यालयाचे रस्ते अंधारातच

By admin | Updated: November 18, 2015 01:52 IST

सालेकसा हे तालुका मुख्यालयाचे स्थळ असूनसुध्दा येथील जवळपास सर्वच रस्ते व चौक रात्रभर अंधारात असतात.

वाली कोणीच नाही : प्रशासकांचे दुर्लक्षसालेकसा : सालेकसा हे तालुका मुख्यालयाचे स्थळ असूनसुध्दा येथील जवळपास सर्वच रस्ते व चौक रात्रभर अंधारात असतात. त्यामुळे येथे रात्री बेरात्री ये-जा करणाऱ्या लोकांना त्रास तर होतोच, तसेच नेहमी धोक्याची शक्यता असते. आदिवासी, नक्षलग्रस्त व मागासलेला तालुका म्हणून सालेकसाची सर्वत्र ओळख आहे. या तालुक्यात मागासलेले लोक मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास असून येथे सोमवारला आठवडी बाजार भरत असतो. तो बाजार रात्रीपर्यंत चालतो. त्यामुळे बाजारात येणाऱ्या ग्राहकांना तसेच दुकानदारांना विद्युत खांबावरील दिव्यांचा लाभ मिळत नाही. कारण येथील रस्त्यावरील खांबावर एक तर पथदिवे नाही किंवा काही ठिकाणी आहेत ते बंद पडून आहेत. त्यामुळे रस्त्यावर किंवा चौकात सर्वत्र अंधार पसरेला असतो. सालेकसा हे मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असून येथे रेल्वे स्टेशनची सोय आहे. या रेल्वेस्टेशनवर सर्व लोकल गाड्या तसेच शालीग्राम एक्सप्रेस आणि छत्तीसगड एक्सप्रेस या गाड्यांचा सुध्दा थांबा आहे. त्यामुळे या रेल्वे स्टेशनवरून २४ तास रेल्वे प्रवाशांचा ये-जा सुरू असते. ते रेल्वे प्रवासी रात्री-बेरात्री सुध्दा ये-जा करतात. परंतु रस्त्यावर पथदिवे नसल्याने रात्रीला भयमुक्त वातावरण निर्माण होते. रस्त्यावरून चालत असताना काही खासगी दुकानदारान्ांी लावलेले दिवे थोडा दिलासा देणारे ठरतात. सालेकसावरून राज्य महामार्ग क्रमांक २४९ गेला असून हा मार्ग महाराष्ट्राला छत्तीसगड राज्याशी जोडण्याचे काम करतो. तसेच उत्तरेकडे मध्यप्रदेशला जोडतो. त्यामुळे या मार्गावरून २४ तास सतत वाहने चालतात. परंतु तालुक्याचे ठिकाण असताना येथे पथदिवे नसल्याने अनेक अपघात सुध्दा घडतात. हा सर्व प्रकार थांबविण्यासाठी पथदिवे व्यवस्थीत असणे आवश्यक आहे. सध्या नगर पंचायतचे काम थंडबस्त्यात असून प्रशासकांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)