शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या मेहनतीवर महसूलचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST

मोहाडी तालुक्यातील रोहा घाटावर गत काही महिन्यांपासून अवैध तस्करी जोमात सुरू आहे. जेसीबीच्या सहायाने उत्खनन करून ट्रक, ट्रॅक्टरने त्याची वाहतूक केली जाते. आतापर्यंत अनेकदा पोलिसांनी कारवाया करूनही महसूलने मात्र दुर्लक्षच केल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देरेती तस्करी : तक्रार देण्यास विलंब, तस्करांची पाठराखण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू असून याला आळा घालण्याची जबाबदारी महसूल विभागाची असतानाही पोलीस कारवाई करून तस्करांच्या मुसक्या आवळतात. मात्र या पोलिसांच्या मेहनतीवर महसूल विभाग पाणी फेरत असल्याचे दिसून येते. मोहाडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत उशिरापर्यंत तक्रार देण्यात टाळाटाळ महसूल विभागाने केली. यावरून तस्कर आणि महसूलचे साटेलोटे लक्षात येत आहे.मोहाडी तालुक्यातील रोहा घाटावर गत काही महिन्यांपासून अवैध तस्करी जोमात सुरू आहे. जेसीबीच्या सहायाने उत्खनन करून ट्रक, ट्रॅक्टरने त्याची वाहतूक केली जाते. आतापर्यंत अनेकदा पोलिसांनी कारवाया करूनही महसूलने मात्र दुर्लक्षच केल्याचे दिसत आहे. गुरूवारच्या रात्री रोहा घाटावर अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू, पोलीस उपनिरीक्षक निशांत मेश्राम आपल्या पथकासह रोहा घाटावर पोहचले. विना क्रमांकाच्या पिवळ्या रंगाच्या जेसीबीने उत्खनन सुरू होते. त्या ठिकाणी विना क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर आणि दोन टिप्पर आढळून आले. मात्र पोलिसांचे पथक पोहचताच विश्वनाथ वासूदेव बांडेबुचे यांच्यासह ट्रॅक्टर, टिप्पर, जेसीबी चालक पसार झाले.पोलिसांनी या प्रकाराची माहिती महसूल विभागाला दिली. परंतु नेहमीप्रमाणे त्यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याचे दिसून आले. गुरूवारी रात्री कारवाई करूनही शुक्रवारी रात्रीपर्यंत या प्रकरणात तक्रार देण्यास महसूलकडून टाळाटाळ होत होती. पोलीस आपला जीव धोक्यात घालून घाटावर जावून कारवाई करतात. महसूल विभागाला त्याची सूचना देतात. परंतू आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याने महसूल विभाग कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते. याप्रकरणातही एक दिवस उशिराने मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.महसूल विभागाचे पथक कुचकामीरेती तस्करीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाने विविध पथक तयार केले आहे. मात्र या पथकांची कारवाई दिसून येत नाही. उलट ठिकठिकाणी पोलीसच कारवाई करताना दिसतात. महसूलचे पथक केवळ वसुलीच्या मागे दिसून येते.

टॅग्स :Policeपोलिस