शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी सेवासंघातर्फे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन

By admin | Updated: May 30, 2014 00:10 IST

गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे यांना ज्वलनशील पदार्थ टाकून जिवंत जाळण्यात आले. या दुर्दैवी घटनेचा ओबीसी सेवा संघ सामाजिक अन्याय निवारण संघर्ष समितीच्या वतीने तीव्र

गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे यांना ज्वलनशील पदार्थ टाकून जिवंत जाळण्यात आले. या  दुर्दैवी घटनेचा ओबीसी सेवा संघ सामाजिक अन्याय निवारण संघर्ष समितीच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला. मात्र याप्रकरणी पोलिसंनी तपास करून खरे आरोपी कोण आहेत हे स्पष्ट झाले असतानाही काही संघटना यामध्ये हस्तक्षेप करून या प्रकरणाला जातीय वळण देऊन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा पद्धतीने पोलिसांवर दबाव आणू नका आणि निर्दोष असणार्‍यांची सुटका करा, अशी मागणी निवेदनातून मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे करण्यात आली.या प्रकरणात काही लोक सामाजिक शांतता भंग होईल असे कृत्य करीत आहेत. यावर शासनाने त्वरीत आळा घालून या प्रकरणातील निर्दोष लोकांची सुटका करावी या मागणीसाठी ओबीसी सेवा संघ सामाजिक अन्याय निवारण संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. याप्रकरणी कवलेवाडा येथील ६ आरोपींना संशयित म्हणून अटक करण्यात आली होती. या जळीत प्रकरणातील खरे आरोपी पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानंतरही त्यांच्यावर पोलीस विभागाने ३0२ व अँट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील खर्‍या आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना अटकेत ठेवण्याचे कुठलेही कारण नसताना पोलीस विभागाने त्यांची त्वरीत सुटका करायला हवी होती, मात्र काही संघटनाच्या दबावामुळे पोलीस विभाग त्यांना मुक्त करण्यात उशीर करित असल्याने ओबीसी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला असल्याची माहिती निवेदनातून देवून सामाजिक सलोखा बिघडविणार्‍या कृत्यांना शासनाने तत्काळ आळा न घातल्यास देशातील सर्व ज्ञात मोठा घटक या नात्याने ओबीसी समाजालाही रस्त्यावर उतरेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना माजी आ.हेमंत पटले, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, संजय टेंभरे, रेखलाल टेंभरे, बबलू कटरे, गुलाबंद बोपचे, प्रा. संजय रहांगडाले, तिर्थराज हरिणखेडे, राजेश नागरिकर, अमर वर्‍हाडे, कैलास भेलावे, संतोष खोब्रागडे, सुरेश टेंभरे, मोहन गौतम, अजीत टेंभरे, रुपेश कुथे, राजेश चव्हाण, किशोर भगत, बी.डब्ल्यूृ. कटरे, अनिल टेंभरे, शिबीर कटरे, आर.आर.बिसेन, डॉ. संजीव रहांगडाले, बाबा बिसन, दिपक देशमुख, प्रा.एच.एच.पारधी, खेमेंद्र कटरे, महेंद्र बिसेन, संजय ठाकरे, सावन डोये, मनिष मुनेश्‍वर, सविता बेदरकर, चौधरी, गुड्ड कारडा उपस्थित होते. बबलू कटरे यांनी निवेदनाचे वाचन केले. निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर तर पो.अधीक्षक दिलीप झलके यांनी निवेदन स्विकारले.