ओबीसी सेवासंघातर्फे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन

By Admin | Updated: May 30, 2014 00:10 IST2014-05-30T00:10:51+5:302014-05-30T00:10:51+5:30

गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे यांना ज्वलनशील पदार्थ टाकून जिवंत जाळण्यात आले. या दुर्दैवी घटनेचा ओबीसी सेवा संघ सामाजिक अन्याय निवारण संघर्ष समितीच्या वतीने तीव्र

Request for Chief Minister and Home Minister through OBC Services | ओबीसी सेवासंघातर्फे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन

ओबीसी सेवासंघातर्फे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन

गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे यांना ज्वलनशील पदार्थ टाकून जिवंत जाळण्यात आले. या  दुर्दैवी घटनेचा ओबीसी सेवा संघ सामाजिक अन्याय निवारण संघर्ष समितीच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला. मात्र याप्रकरणी पोलिसंनी तपास करून खरे आरोपी कोण आहेत हे स्पष्ट झाले असतानाही काही संघटना यामध्ये हस्तक्षेप करून या प्रकरणाला जातीय वळण देऊन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा पद्धतीने पोलिसांवर दबाव आणू नका आणि निर्दोष असणार्‍यांची सुटका करा, अशी मागणी निवेदनातून मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे करण्यात आली.
या प्रकरणात काही लोक सामाजिक शांतता भंग होईल असे कृत्य करीत आहेत. यावर शासनाने त्वरीत आळा घालून या प्रकरणातील निर्दोष लोकांची सुटका करावी या मागणीसाठी ओबीसी सेवा संघ सामाजिक अन्याय निवारण संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
याप्रकरणी कवलेवाडा येथील ६ आरोपींना संशयित म्हणून अटक करण्यात आली होती. या जळीत प्रकरणातील खरे आरोपी पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानंतरही त्यांच्यावर पोलीस विभागाने ३0२ व अँट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील खर्‍या आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना अटकेत ठेवण्याचे कुठलेही कारण नसताना पोलीस विभागाने त्यांची त्वरीत सुटका करायला हवी होती, मात्र काही संघटनाच्या दबावामुळे पोलीस विभाग त्यांना मुक्त करण्यात उशीर करित असल्याने ओबीसी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला असल्याची माहिती निवेदनातून देवून सामाजिक सलोखा बिघडविणार्‍या कृत्यांना शासनाने तत्काळ आळा न घातल्यास देशातील सर्व ज्ञात मोठा घटक या नात्याने ओबीसी समाजालाही रस्त्यावर उतरेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
निवेदन देताना माजी आ.हेमंत पटले, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, संजय टेंभरे, रेखलाल टेंभरे, बबलू कटरे, गुलाबंद बोपचे, प्रा. संजय रहांगडाले, तिर्थराज हरिणखेडे, राजेश नागरिकर, अमर वर्‍हाडे, कैलास भेलावे, संतोष खोब्रागडे, सुरेश टेंभरे, मोहन गौतम, अजीत टेंभरे, रुपेश कुथे, राजेश चव्हाण, किशोर भगत, बी.डब्ल्यूृ. कटरे, अनिल टेंभरे, शिबीर कटरे, आर.आर.बिसेन, डॉ. संजीव रहांगडाले, बाबा बिसन, दिपक देशमुख, प्रा.एच.एच.पारधी, खेमेंद्र कटरे, महेंद्र बिसेन, संजय ठाकरे, सावन डोये, मनिष मुनेश्‍वर, सविता बेदरकर, चौधरी, गुड्ड कारडा उपस्थित होते. बबलू कटरे यांनी निवेदनाचे वाचन केले. निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर तर पो.अधीक्षक दिलीप झलके यांनी निवेदन स्विकारले.
 

Web Title: Request for Chief Minister and Home Minister through OBC Services