शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

गोवारी समाजाला केंद्राच्या सूचित टाका

By admin | Updated: December 23, 2015 02:26 IST

विदर्भात १२ लाखाच्या जवळपास असणाऱ्या गोवारी समाजाची आजही उपेक्षा केली जात आहे.

५० वर्षांपासून उपेक्षा : स्वतंत्र महामंडळ स्थापन्याची बन्सोड यांची मागणीगोंदिया : विदर्भात १२ लाखाच्या जवळपास असणाऱ्या गोवारी समाजाची आजही उपेक्षा केली जात आहे. एक दशकापूर्वी नागपूर अधिवेशनात ११४ गोवारी समाजाचा बळी गेला असताना आजही शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. राज्य व केंद्र या दोन्ही ठिकाणी भाजप सरकार असून यापूर्वी आपण सत्तेवर आल्यावर गोवारी समाजाला केंद्र व राज्याचे सुचीमध्ये समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले होते ते आता पूर्ण करायला पाहिजे आणि गोवारी समाजाकरिता विशेष महामंडळ स्थापित करून त्यांना योजनेचा लाभ द्यायला पाहिजे, असे मत तिरोडा क्षेत्राचे माजी आमदार दिलीप बंसोड यांनी व्यक्त केले. यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त करताना बन्सोड म्हणाले, गोवारी समाजाची आज दयनिय अवस्था आहे. समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याकरिता ११४ समाजबांधवांचा बळी गेला. अशी दुर्दैवी घटना पूर्वी घडली नाही. आजचे सरकार विरोधी पक्षात असताना आपण सत्तेवर आल्यावर गोवारी समाजाला पूर्ण न्याय देवू, केंद्र शासनाच्या जातीच्या सूचित समाविष्ट करू, त्याकरिता स्वतंत्र गोवारी विकास महामंडळाची स्थापना करू असे आश्वासन देत होते. आजच्या घडीला केंद्र व राज्य दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता आहे. गोवारी समाजाला केंद्र शासनाच्या सूचित आणून गोवारी समाजाकरिता स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी. या माध्यमाने गोवारी समाजाच्या उत्थानाकरिता शिक्षणाच्या सुविधा व मदत, व्यवसायाकरिता आर्थिक सहाय्य आणि नोकरी सहीत अन्य रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात, अशी अपेक्षा माजी आ.बंसोड यांनी मत व्यक्त केली.१९५० पूर्वी गोवारी समाज आदिवासी प्रभागात होते. त्यावेळी गोंड-गोवारी ही संयुक्त जात दर्शविल्या जात होती. माजी आ.बाबुराव मडावी हे आदिवासी मंत्री असताना गोंडगोवारी ही जात अस्तित्वात नसल्याचे सांगून रद्द करण्यात आली. तेव्हापासून गोवारी समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. सतत लढा दिल्यानंतरही हा समाज उपेक्षित असल्याचे बंसोड म्हणाले. गोवारी समाजाला केंद्र शासनाच्या जातीत समाविष्ट करावे आणि या जातीकरिता अन्य मागास क्षेत्राच्या विकासाकरिता स्वतंत्र महामंडळे स्थापित केल्याशिवाय या समाजबांधवांचा विकास होणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)