शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

गोंडी भाषा व साहित्याला मिळणार पुनरूज्जीवन

By admin | Updated: May 13, 2016 01:47 IST

मागील दोन वर्षापासून गोंडी भाषा संशोधनावर परिश्रम घेत असलेल्या कवियत्री उषाकिरण आत्राम (ताराम) ...

ताराम दाम्पत्याचे परिश्रम : दिल्लीत १५ आदिवासी भाषांचे साहित्य सादर सालेकसा : मागील दोन वर्षापासून गोंडी भाषा संशोधनावर परिश्रम घेत असलेल्या कवियत्री उषाकिरण आत्राम (ताराम) आणि सुन्हेरसिंह ताराम या दाम्पत्याने तयार केलेल्या गोंडी साहित्याला राष्ट्रीय स्तरावर उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आदिवासींच्या विविध भाषेत गोंडी भाषेचे साहित्य त्यांनी सादरीकरण केले आहे. या यशस्वी सादरीकरणामुळे लोप पावत चालत असलेली गोंडी भाषा पुनजिर्वीत करण्यासाठी गोंडी साहित्यिकांना प्रोत्साहन आणि दिलासा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय आदिवासी साहित्य मंच व रमणिका फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) नवी दिल्ली यांच्यावतीने भारतीय भाषा केंद्र एस.एस.एस.सभागृह येथे भारतीय उपखंडातील आदिवासी भागात बोलल्या जाणाऱ्या एकूण १५ आदिवासी भाषांतील साहित्य सादर करण्यात आले. यात मध्यभारतातील गोंडवाना क्षेत्रातील गोंडी भाषेतील साहित्य ताराम दाम्पत्याने सादर केले ते सर्वश्रेष्ठ ठरले आहे. ‘विरासत की आदिवासी गोंडी कहानिया’ या शीर्षकाखाली एकूण १० कथा गोंडी भाषेत तयार करण्यात आल्या होत्या. देवनागरी लिपीचा उपयोग करून तयार करण्यात आलेल्या या १० कथांना हिंदीत भाषांतर करून सादर करण्यात आल्या. त्यामुळे गोंडी साहित्य भाषा समजण्यास सोयीस्कर ठरत आहे. तसेच गोंडी भाषा समजणे व बोलणे सोपे होऊ होणार आहे. ज्या १० कथांना गोंडी भाषेत तयार करण्यात आले. त्यात वर्धा येथील बामसेफ विधारधारेचे लेखक, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडला आपले कार्यक्षेत्र बनवणारे भाषा संशोधक सुभेदार प्रदीप मडावी, गोंडवाना दर्शनचे संपादक सुन्हेरसिंह ताराम, अ‍ॅड.रामराजे आत्राम, नागपूर येथील गोंडी लेखक जी.आर.मडावी, दिग्रस (यवतमाळ) येथील लेखक बाबाराव मडावी, धानोरा (गडचिरोली) येथील लेखक मनीरावण दुग्गा, सेलू (वर्धा) येथील लेखिका वसुधा मडावी, जबलपूर येथील इंजिनियर रघुवीरसिंह मारको, बालाघाट येथील लेखिका सुशीला धुर्वे तसेच उषाकिरण आत्राम यांनी या साहित्यिकांच्या कथांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)- प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत मिळविले यशसर्व लेखकांनी आपआपल्या कथा गोंडी भाषेत लिहून आंचलिक भाषा संशोधन केंद्र धनेगाव येथे सादर केल्या त्या कथांवर संशोधन करून देवनागरी लिपीत शुध्द गोंडी भाषेत त्या भाषांतरित करण्यात आल्या. त्यानंतर गोंडवाना दर्शनचे संपादक सुन्हेरसिंह ताराम यांनी त्या सर्व कथाचे हिंदीत भाषांतर केले. उषाकिरण आत्राम (ताराम) आणि त्याचे पती सुन्हेरसिंह ताराम यांनी आदिवासी गावामध्ये गोंडी भाषा बोलणाऱ्या लोकांशी थेट संपर्क साधून व संवाद साधून गोंडी शब्दांचा संग्रह केला आणि गोंडी साहित्य निर्माण केले. दरम्यान त्यांना अनेक अडचणींना सुध्दा तोंड द्यावे लागले. प्रतिकूल परिस्थितीने खचून न जाता त्यांनी दोन वर्षे अविरत परिश्रम घेतले. शेवटी त्यांना त्यात यश मिळाले. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर गोंडी भाषेचा डंका वाजवून दाखविला.