केंद्राच्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 06:00 AM2019-08-25T06:00:00+5:302019-08-25T06:00:12+5:30

केंद्र सरकारच्या अनेक लोककल्याणकारी तसेच ग्रामीण व शहरी भागाच्या विकासाच्या योजनांचा आढावा खासदार सुनील मेंढे यांनी घेतला. यानिमित्त गुरूवारी (दि.२२) येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Reach out to the beneficiaries of the scheme of the center | केंद्राच्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा

केंद्राच्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा

Next
ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या योजनांचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र सरकारच्या अनेक लोककल्याणकारी तसेच ग्रामीण व शहरी भागाच्या विकासाच्या योजनांचा आढावा खासदार सुनील मेंढे यांनी घेतला. यानिमित्त गुरूवारी (दि.२२) येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अलताफ हमीद, परिविक्षाधीन भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, जि.प.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हाश्मी, विरेंद्र अंजनकर, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, लेखाधिकारी बावीस्कर प्रमुख्याने उपस्थित होते. केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळाला पाहिजे. यासाठी आरोग्य विभागाने तळागाळापर्यंत या योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली पाहिजे. यासाठी यंत्रणांनी सकारात्मक दृष्टीने काम करावे असे त्यांनी सांगीतले.
सभेला प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदकिशोर नायनवाड, जि.प.लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंता विश्वकर्मा यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Reach out to the beneficiaries of the scheme of the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.