शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

यंदाची धान खरेदी वांद्यात!

By admin | Updated: November 1, 2014 23:08 IST

धानाचे कोठार असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी शासनाच्या हमीभावानुसार होणारी धान खरेदी वांद्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे सबएजंट म्हणून काम करणाऱ्या

सबएजंट तयारच नाहीत : भाड्याची अटही गोदाममालकांना मान्य नाहीमनोज ताजने - गोंदियाधानाचे कोठार असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी शासनाच्या हमीभावानुसार होणारी धान खरेदी वांद्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे सबएजंट म्हणून काम करणाऱ्या विविध सहकारी संस्थांनी यावर्षी शासनाच्या नियम-अटींमुळे बेजार होऊन धान खरेदी करण्यास चक्क नकार दिल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. ऐन शेतकऱ्यांचा धान विक्रीसाठी सज्ज होत असताना ही अडचण निर्माण झाल्यामुळे मोठा वांदा होण्याची शक्यता आहे.राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपसचिव सतीश सुपे यांनी गुरूवारी ३० आॅक्टोबरला खरेदीबाबतचा शासन आदेश काढला. त्यात केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार २०१४-१५ च्या खरीप हंगामात किमान आधारभूत किमतीनुसार धान्य व भरडधान्य खरेदीचे आदेश दिले आहेत. धानाचा पट्टा असलेल्या गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासीबहुल क्षेत्रात आदिवासी विकास महामंडळामार्फत केली जाते. या दोन्ही एजंट संस्था गावोगावी धान खरेदीसाठी सहकारी संस्थांना सबएजंट म्हणून नियुक्त करतात. या केंद्रांवर खरेदी केलेल्या धानाची भरडाई होईपर्यंत गोदामात योग्य साठवणूक करणे, त्याची देखभाल, वाहतूक, भरडाई अशी जबाबदारी संबंधित यंत्रणेची असते.धानाची साठवणूक करण्यासाठी शासकीय गोदामे मोजकेच आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खासगी गोदामे भाड्याने घ्यावे लागतात. गतवर्षीपर्यंत कोणत्या गोदामाचे किती मासिक भाडे द्यायचे हे सार्वजनिक बांधकाम विभाग निश्चित करीत होते. त्यानुसार ४ सरकारी तर ८३ खासगी गोदामांमध्ये खरेदी केलेला धान साठवून ठेवण्यात आला होता. मात्र यावर्षीच्या आदेशात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार भरडाई केलेल्या धानाच्या साठवणुकीसाठी खासगी गोदाम मालकांना २.४० रुपये प्रतिक्विंटल प्रतिमहिना असा दर निश्चित करण्यात आला आहे. त्यातही हे भाडे केवळ दोनच महिने देण्यात येणार आहे. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीसाठी गोदाम देण्यास कोणीही गोदाम मालक तयार नसल्यामुळे खरेदी केलेला धान सुरक्षितपणे ठेवायचा कुठे? असाही प्रश्न निर्माण होणार आहे.या सर्व पेचप्रसंगात गोंदिया व भंडारा जिल्हा आधारभूत धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थांच्या संघटनेने २००९ ते २०११ पर्यंतच्या ३६ महिन्याच्या कालावधीत धानाच्या भरडाईअभावी आलेली मोठी घट शासनाने मान्य करावी, गोदाम भाडे त्वरित द्यावे, खरेदी खर्च व हमालीच्या दरात वाढ करावी, सबएजंट संस्थांचा २००९ पासूनचा हिशेब पूर्ण करून त्यांचे कमिशन त्यांना द्यावे आणि धानाची खरेदी होताच विलंब न लावता त्या धानाची भरडाईसाठी उचल करावी अशा मागण्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे केल्या आहेत. या मागण्यांचा विचार होण्यासोबतच गोदामांचा प्रश्न निकाली निघाल्याशिवाय मार्केटिंग फेडरेशनची धान खरेदी सुरू होणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहण्याशिवाय इलाज नाही. यात व्यापारी मात्र हात धुवून घेत आपली कमाई करणार आहेत.