शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णालयांत अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST

आदिवासी बहूल, नक्षल प्रभावित जिल्ह्यातील जनता आधीच आर्थिक संकटात आहे. त्यात अनेक शासकीय रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून अनेक अद्ययावत सोयी सुविधा नसल्याने त्यांच्या समस्येत आणखी भर पडत आहे. या सर्वसोयी शासकीय रूग्णालयांमध्ये उपलब्ध करण्याची मागणी वराडे यांनी केली. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक रूखमोडे यांना निवेदन दिले व चर्चा केली.

ठळक मुद्देअमर वराडे : कॉँग्र्रेस कमिटीकडून जिल्हाधिकाऱ्यांना दिले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील जिल्हा रूग्णालयसह जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध करवून देण्यात याव्या अशी मागणी कॉँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव अमर वराडे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना निवेदन दिले आहे.येथील केटीएस जिल्हा रूग्णालय, बाई गंगाबाई महिला व बाल रूग्णालय शिवाय ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोठ्या संख्येत रूग्ण उपचारासाठी येतात. मात्र सद्यस्थितीत डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारी कोविड-१९ या विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेत व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत अन्य आजारांच्या रूग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. काही रूग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अद्ययावत सोयी सुविधा नाहीत. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रु ग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण आणि आता उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांमुळे रु ग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. कोविड-१९ मुळे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि पायाभूत सुविधा कोविड-१९ च्या उपचार घेणाऱ्या रूग्णांकरीता राखीव केली आहे.अशा परिस्थितीत दूर अंतरावरून येथील रूग्णालयात उपचाराची अपेक्षा घेऊन येणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. आदिवासी बहूल, नक्षल प्रभावित जिल्ह्यातील जनता आधीच आर्थिक संकटात आहे. त्यात अनेक शासकीय रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून अनेक अद्ययावत सोयी सुविधा नसल्याने त्यांच्या समस्येत आणखी भर पडत आहे. या सर्वसोयी शासकीय रूग्णालयांमध्ये उपलब्ध करण्याची मागणी वराडे यांनी केली. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक रूखमोडे यांना निवेदन दिले व चर्चा केली.यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सूर्यप्रकाश भगत, शहर काँग्रेसचे महासचिव अरूण गजभिये, युथ काँग्रेस जिल्हाध्यक्ष आलोक मोहंती, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष हरिष तुळकर, ओबीसी विभागाचे तालुकाध्यक्ष सुशिल खरखाटे, एनएसयुआय गोंदिया विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बाबा बागडे, दलेश नागदवणे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीHealthआरोग्य