शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST

हवामान विभागाने जिल्ह्यात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा देखील ठरला. जिल्ह्यालगत असलेल्या लगतच्या मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यात  मंगळवारी अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यानंतर रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. 

ठळक मुद्देरब्बी पिकांचे नुकसान : केंद्रावरील धान भिजले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यात मंगळवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर बुधवारी (दि.१७) पहाटेपासून अवकाळी पावसाने सर्वत्र हजेरी लावली. अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील हरभऱ्यासह इतर रब्बी पिकांना फटका बसला. तर धान खरेदी केंद्रावरील धान मोठ्या प्रमाणात उघड्यावर पडून असल्यामुळे अवकाळी पावसामुळे धान भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा देखील ठरला. जिल्ह्यालगत असलेल्या लगतच्या मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यात  मंगळवारी अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यानंतर रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. तर बुधवारी पहाटे सुद्धा जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे वातावरणात दिवसभर गारवा होता. तर दिवसभर ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे रब्बी पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. तर मागील दोन महिन्यापासून राईस मिलर्स असोसिएशनने त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन शासकीय धान खरेदी केंद्रावरुन धानाची उचल करुन त्याची भरडाई करणे बंद केले आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेला जवळपास २५ लाख क्विंटल धान उघड्यावर पडला आहे. काही धानाला ताडपत्र्या झाकून ठेवण्यात आले आहे. मात्र केंद्रावर मोठ्या प्रमाणात धान पडून असल्याने काही प्रमाणात धान ओला झाल्याची माहिती आहे. मात्र यासंदर्भात या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी अवकाळी पावसामुळे धानाचे नुकसान झाले नसल्याचे सांगितले. 

गोदामे नसल्याने धान उघड्यावर आदिवासी विकास महामंडळातंर्गत खरेदी करण्यात आलेले धान साठवून ठेवण्यासाठी अद्यापही गोदामांची व्यवस्था नाही. त्यामुळे या विभागाने खरेदी केलेले धान तसेच उघड्यावर ताडपत्र्या झाकून ठेवले जाते. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यंदा धान साठवून ठेवण्यासाठी २२० गोदामे बुक केली होती. पण राईस मिलर्स असोसिएशनने धानाची उचल न केल्याने गोदामे हाऊस भरली असून लाखो क्विंटल धान उघड्यावर आहे. त्यामुळे या धानाला झाकण्यासाठी पुरेशा ताडपत्र्या आणि या विभागाचे नियोजन नसल्याने धान भिजल्याची माहिती आहे. मात्र आता या दोन्ही विभागांकडून यावर पांघरुण टाकले जात आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस