शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रौत्सवाची तयारी जोमात

By admin | Updated: October 5, 2015 02:04 IST

गणरायाला निरोप दिल्यानंतर आता नवरात्रौत्सव काही दिवसांवरच आले आहे. त्यातही गोंदिया शहराची शान असलेल्या नवरात्रोत्सवाची दूरवर ख्याती

मूर्तिकार व्यस्त : मंडप उभारणीचे काम जोमातगोंदिया : गणरायाला निरोप दिल्यानंतर आता नवरात्रौत्सव काही दिवसांवरच आले आहे. त्यातही गोंदिया शहराची शान असलेल्या नवरात्रोत्सवाची दूरवर ख्याती असून शहरात उत्सवाची तयारी जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे. गणरायाला निरोप देऊन मुर्तीकार आता दुर्गामातेच्या मुर्त्या साकारण्यात व्यस्त दिसून येत आहेत. तर मंडळांकडून मंडप उभारणीचे काम सुरू झाले आहे. येत्या १३ तारखेला मातेचे आगमन होणार असल्याने सर्वांनाच तिच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे. राज्याच्या टोकावर वसलेल्या गोंदिया जिल्ह्यात नवरात्रोत्सव थाटात साजरा केला जातो. त्यातही विशेष म्हणजे गोंदिया शहरात नवरात्रोत्सवाची धूम काही औरच असते. यामुळेच येथील नवरात्रौत्सवाची दूरवर ख्याती आहे. या प्रसिद्धीमुळेच मध्य प्रदेश व छत्तीसगडसह दूरवरून भाविक येथील उत्सवाची भव्यता बघण्यासाठी नवरात्रौत्सवाच्या काळात गोंदियात येतात. त्यामुळेच येथील उत्सवाची भव्यता दरवर्षी वाढतच चालली आहे. हजारोंच्या संख्येत नवरात्रोत्सवाच्या काळात भाविक गोंदियात येत असल्याने या नऊ दिवसांत शहर गजबजलेले असते. शिवाय नऊ दिवस दुर्गामातेचा विराजमान राहत असल्याने हे दिवस नवचैतन्याने भरलेले असतात. येत्या १३ तारखेला घटस्थापना असून मातेचे आगमन होणार असल्याने मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे. आपले मंडप वेगळे व आकर्षक बनावे यासाठी मंडप उभारणी जोमात सुरू आहे. त्यातही येथील काही मंडळांच्या उत्सवाची ख्याती असल्याने त्यांचे काम जोमात सुरू आहे. शिवाय मूर्तिकारही घेतलेल्या आॅर्डरच्या मूर्ती तयार करण्यासाठी आपल्या परिवारासह सध्या व्यस्त दिसून येत आहेत. तर मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्सवाच्या तयारी व वर्गणीत व्यस्त आहे. (शहर प्रतिनिधी)