शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन शिक्षणात गरीब विद्यार्थी माघारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:01 IST

या परिसरातील सर्वच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असून काही मोजक्याच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असते. ज्यांची परिस्थिती चांगली असेल त्यांच्या पालकांकडे स्मार्ट मोबाईल असतील ते विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण प्रणालीला प्रतिसाद देतील. मात्र ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट मोबाईल सुविधा उपलब्ध नाही ते विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण प्रणालीमध्ये वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देस्मार्ट फोन घेणे गोरगरीब पालकांच्या आवक्या बाहेर : विद्यार्थ्यांची होतेय अडचण

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार शहराप्रमाणे ग्रामीण भागातील शिक्षकांनी सुद्धा ऑनलाइन शिक्षण प्रणालीद्वारे शिक्षण देणे सुरु केले आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाकडे स्मार्ट मोबाईल फोन आहेत. त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रणालीचे शिक्षण शक्य आहे.परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नाहीत किंवा ते घेवू शकत नाही ते विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण प्रणालीमध्ये माघारल्याशिवाय राहणार नाही. गरीब विद्यार्थ्यांची ऑनलाइन शिक्षण प्रणालीमध्ये कुचंबना होत आहे.या परिसरातील सर्वच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असून काही मोजक्याच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असते. ज्यांची परिस्थिती चांगली असेल त्यांच्या पालकांकडे स्मार्ट मोबाईल असतील ते विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण प्रणालीला प्रतिसाद देतील. मात्र ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट मोबाईल सुविधा उपलब्ध नाही ते विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण प्रणालीमध्ये वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.गरज म्हणून केवळ शिक्षणासाठी महागड्या किंमतीच्या स्मार्ट मोबाईल खरेदी करणे गरीब विद्यार्थ्यांना शक्यच नाही. कोरोना विषाणूच्या महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन ३१ जुुुलैपर्यंत वाढविले आहे. परिणामी अनेकांचा रोजगार हिरावला आहे. अशा अडचणीत उदरनिर्वाहासाठी कसरत करावी लागत आहे. यातच शहरी विभागासारखेच या ग्रामीण भागातील शाळांनी सुद्धा ऑनलाइन शिक्षण प्रणाली देण्याची सज्जता दाखविली आहे. यामुळे मात्र गरीब विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणप्रणालीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. काही विद्यार्थ्यांची कुंचबना होताना दिसत आहे.या परिसरात शेतकरी, शेतमजूर अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे आपल्या पाल्यांना सात आठ हजार रुपये किमतीचा स्मार्ट मोबाईल खरेदी करुन देणे शक्य होणार नाही. या ऑनलाइन शिक्षणप्रणालीमध्ये ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी माघारल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :Studentविद्यार्थी