शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST

कोरोनाचा कहर देशात दिवसेंदिवस वाढत असल्याने रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘सोशल डिस्टंन्सिंग’ हाच एकमेव उपाय असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकांनी आपापल्या घरात राहणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊनच अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. याशिवाय, विविध प्रतिबंधात्मक कलमा लावून लोकांना घरबाहेर पडणे व गर्दी करण्यावर अंकुश लावण्यात आले आहे.

ठळक मुद्देवाहनातून दिली जात आहे सूचना : अन्यथा कठोर कारवाईचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले असतानाही काही बेजबाबदार नागरिक आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. रस्त्यावर फिरणारे हे सर्व पोलिसांच्या नजरेत येत असून अशांना पोलिसांकडून वाहनांतून आत राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र त्यावर काहीच परिणाम जाणवत नसल्याने आता कठोर कारवाईच्या तयारीत पोलीस विभाग दिसत असून तसा इशारा देण्यात आला आहे.कोरोनाचा कहर देशात दिवसेंदिवस वाढत असल्याने रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘सोशल डिस्टंन्सिंग’ हाच एकमेव उपाय असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकांनी आपापल्या घरात राहणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊनच अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. याशिवाय, विविध प्रतिबंधात्मक कलमा लावून लोकांना घरबाहेर पडणे व गर्दी करण्यावर अंकुश लावण्यात आले आहे. शासनाच्या आदेशाला सुमारे ९०-९५ टक्के नागरिक जुमानत असले तरिही उरलेले काही बेजबाबदार मात्र आदेशाचे उल्लंघन करून घराबाहेर पडत आहेत.अशा या समाजकंटकांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे कोरोनाचे रूग्ण वाढतच असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे.विशेष म्हणजे, घराबाहेर फिरणाºया या लोकांवर पोलिसांची नजर असून फक्त थेट काठीचा वापर योग्य नसल्याने तेही समजूत घालून अशांना घरी राहण्यासाठी आवाहन करीत आहेत. मात्र त्याचा काहीच परिणाम जाणवत नसल्याने आता मात्र पोलिसांनी वाहनांतून लोकांना सूचना देण्यास सुरूवात केली आहे.यानंतरही लोकांनी घराबाहेर फिरणे बंद न केल्यास मात्र कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.परिवार व स्वत:साठी घरात रहाकोरोनासोबत सुरू असलेला हा लढा शासनाचा स्वत:साठी नसून देशवासीयांसाठी सुरू आहे. यामुळे लोकांनी आपापल्या घरात राहूनच कोरोनाला मात देण्यास सहकार्य करावे असे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांसाठी सर्वच मंत्री व अधिकारी आवाहन करीत आहेत. मात्र काही शासनाचे आवाहन गमतीत घेत जाणून घराबाहेर निघत आहे. कुणासाठी नव्हे तर आपल्या परिवार व स्वत:साठी घरात असे आवाहन केले जात आहे.वसाहतींमध्ये आदेशाची धुडकावणीबाजारभाग व शहरातील मुख्य रहिवासी भागातील लोक घरबाहेर निघणे टाळत आहेत. मात्र नव्याने शहरा लगत वसलेल्या कॉलनींमध्ये पोलीस जात नसल्याने या कॉलनींंमध्ये दिवसभर नागरिकांची ये-जा सुरूच असते. विशेष म्हणजे, गुटखा शौकींनाना गुटख्या शिवाय होत नसल्याने ते हमखास जुगाड करण्यासाठी निघत असल्याचे दिसत आहे.रात्रीला पोलीस गस्त गरजेचीदिवसा पोलिसांचा बंदोबस्त राहत असल्याने घराबाहेर पडणे धोकादायक आहे. मात्र रात्रीला कुणीही नसल्याने आरामात फिरायला निघणाऱ्यांची संख्या कमी नाही. रात्रीला कुणी जेवणानंतर शतपावली करायला, कुणी फोनवर बोलण्यासाठी तर कुणी घरातील कुत्र्यांना फिरविण्यासाठी घराबाहेर निघत असल्याचे बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, यामध्ये महिलांचाही समावेश असून यांना पकडून कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी रात्रीला गस्त करण्याची गरज आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस