शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
5
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
6
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
7
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
8
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
9
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
10
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
11
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
12
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
13
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
14
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
15
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
16
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या सुखद आगमनाने रोवणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:00 IST

जिल्ह्यात सर्वत्र सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडत असून अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. परंतु सालेकसा तालुक्यात मध्यम पाऊस पडला असून या तालुक्यातील धरण व तलाव अजूनही रिकामे किंवा अर्धेच भरलेले आहे. दरम्यान पडलेला पाऊस शेतीच्या कामासाठी फार मोलाचा ठरला असून सर्वत्र खोळंबलेल्या रोवण्या सुरु झाल्या आहेत.

ठळक मुद्देखोळंबलेल्या रोवण्या आटोपणार : उशीरा रोवणीमुळे उत्पादनावर होणार परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : आठवडाभरापासून थोड्याफार प्रमाणात पडत असलेल्या पावसाने मागील दोन दिवसांत दमदार हजेरी लावल्याने तालुक्यात भात रोवणीच्या कामाला वेग आला आहे. दरम्यान कोरडवाहू शेतातील खोळंबलेल्या रोवण्या पूर्ण होण्याच्या आशा बळावल्या आहे. परंतु रोवणीची मुदत संपल्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यात सर्वत्र सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडत असून अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. परंतु सालेकसा तालुक्यात मध्यम पाऊस पडला असून या तालुक्यातील धरण व तलाव अजूनही रिकामे किंवा अर्धेच भरलेले आहे. दरम्यान पडलेला पाऊस शेतीच्या कामासाठी फार मोलाचा ठरला असून सर्वत्र खोळंबलेल्या रोवण्या सुरु झाल्या आहेत. येत्या १ आठवड्यात जवळपास सर्वांच्या रोवण्या संपण्याच्या वाटेवर असतील. परंतु ८० टक्के नर्सरी मुदतबाह्य झाल्याने उत्पादनावर मोठा फटका बसेल. कारणी साधारणत: पेरणी नंतर १ महिन्याच्या आत नर्सरीची रोवणी केल्यास धानाच्या तणाचा चांगला विकास होतो वेळेवर रोवणी झाल्यास जास्तीत जास्त फुटवे येतात. त्यामुळे लोंब्याची संख्या वाढते आणि उत्पादनात मोठी वाढ होते.मात्र यंदा पेरणीला २ महिने लोटल्यानंतर पाऊस आला. २ महिन्यांच्या वयाची नर्सरी उपडून पुन्हा रोवणी केल्यास ती विकसित होत नाही. तसेच अशा धानाच्या शेतीला विविध प्रकारच्या रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होतो आणि उत्पादनावर मोठा फटका बसतो. हीच परिस्थिती यंदा निर्माण झालेली आहे. सामान्यत: जून महिन्यात पेरणी नंतर जुलै महिन्यात रोवणी झाल्यास उत्तम असते. परंतु यंदा जुलै महिना कोरडा गेल्याने रोवणी होऊ शकली नाही. आता आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस आला आणि शेतकरी रोवणीकरीत आहे. फटका बसत असला तरी आता समाधान मानावे लागेल.

टॅग्स :Farmerशेतकरी