शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST

हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावरुन दररोज २५ हजारावर प्रवाशी ये-जा करतात. तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागून असल्याने या रेल्वे स्थानकावर बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची संख्या सुध्दा अधिक आहे. कोरोना व्हायरसचा सवार्धिक प्रादुर्भाव हा बाहेर देशातून येणाऱ्या नागरिकांपासून होत आहे.

ठळक मुद्देगर्दी टाळण्यासाठी उपाय योजना : कोरोना इफेक्ट, रेल्वे प्रशासनाची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. रेल्वे स्थानक, बस स्थानक या ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे या आजाराचा संसर्ग अधिक प्रमाणात होऊ शकतो.त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व रेल्वे स्थानकावरील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्म तिकीटाच्या दरात गुरूवारपासून वाढ केली असून आता प्लाटफार्म तिकीटाचे दर ५० रुपये करण्यात आले आहे.हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावरुन दररोज २५ हजारावर प्रवाशी ये-जा करतात. तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागून असल्याने या रेल्वे स्थानकावर बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची संख्या सुध्दा अधिक आहे. कोरोना व्हायरसचा सवार्धिक प्रादुर्भाव हा बाहेर देशातून येणाऱ्या नागरिकांपासून होत आहे. तसेच कोरोनामुळे विदेशात असलेले भारतीय नागरिक स्वगृही परतत आहे. त्यामुळे यापैकी काहीजण रेल्वेने प्रवास करीत असल्याने कोरोनाचा संसर्ग इतर प्रवाशांना सुध्दा होऊ शकतो.त्यामुळे रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही उपाय योजना सुरू केल्या आहे. अनेकजण आपल्या सहकारी किंवा नातेवाईकांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर येतात. यामुळे रेल्वे स्थानकावर गर्दी होते. तर काहीजण १० रुपयांचे प्लॅटफार्म तिकीट काढून रेल्वे स्थानकावरील वायफायचा उपयोग करतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने गर्दी टाळण्याचे निर्देश दिले आहे. याच पार्श्वभुमीवर रेल्वे विभागाने गुरूवारी (दि.१९) गोंदिया रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म तिकीटाचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे गुरूवारपासून गोंदिया रेल्वे स्थानकावर प्लाटफार्म तिकीटाचे दर ५० रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना आता अधिकचा भूर्दंड सोसावा लागणार आहे. मात्र हा निर्णय केवळ काही दिवसांसाठीच असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा प्लॅटफार्म तिकीटाचे दर जैसे थे होणार असल्याचे रेल्वे वाणिज्य विभागाचे मुकेश कुमार यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.प्लॅटफार्म तिकीटाला जवळच्या प्रवासाचे तिकीटरेल्वे विभागाने गुरूवारपासून प्लॅटफार्म तिकीटाचे दर ५० रुपये केले आहे. मात्र यावर काहींनी शक्कल शोधून काढली आहे. गोंदिया ते गंगाझरी, नागरा, कटंगी, हिरडामाली, गोरेगाव या प्रवासाचे दर केवळ १० रुपये आहे. त्यामुळे पन्नास रुपयांचे प्लॅटफार्म तिकीट काढण्याऐवजी १० रुपयाचे जवळच्या प्रवासाचे तिकीट काढून प्लाटफार्मवर प्रवेश करता येतो.त्यामुळे काहींनी याचा अवलंब करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे.दररोज ४०० प्लॅटफार्म तिकिटांची विक्रीगोंदिया रेल्वे स्थानकावरुन दररोज २५ हजारावर प्रवाशी ये-जा करतात. तर नातेवाईक किंवा मित्रांना रेल्वे स्थानकावर सोडायला जाणारे प्लॅटफार्म तिकीट काढतात. त्यामुळेच गोंदिया रेल्वे स्थानकावर दररोज ४०० प्लॅटफार्म तिकिटांची विक्री होत होती. मात्र आता गुरूवारपासून दर वाढविल्याने यात कितपत घट होते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.मोफत वायफायचा वापर करणाऱ्यांचा हिरमोडरेल्वे विभागाने रेल्वे स्थानकावर मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे अनेक जण दहा रुपयांचे प्लॅटफार्म तिकीट काढून वायफायचा वापर करीत होते. मात्र आता प्लॅटफार्म तिकिटाच्या दरात वाढ झाल्याने त्यांचा सुध्दा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसrailwayरेल्वे