शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

१३० हेक्टर क्षेत्रात होणार रोपांची लागवड

By admin | Updated: July 7, 2014 23:39 IST

वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येत असलेल्या वनक्षेत्र सहायक कोहमारा येथे एका हिरवेगार रोपवाटिकेत १ लाख ५८ हजार रोपांची जोपासना केली जात आहे. या रोपवाटिकेत सागवान, बांबू, अांजन, खैर,

राजेश मुनेश्वर - सडक/अर्जुनी
वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येत असलेल्या वनक्षेत्र सहायक कोहमारा येथे एका हिरवेगार रोपवाटिकेत १ लाख ५८ हजार रोपांची जोपासना केली जात आहे. या रोपवाटिकेत सागवान, बांबू, अांजन, खैर, सीताफळ, करंजी, आवळा, बकान, आकाशनिम, शिवन, लिंब आदी रोपांची लागवड केली आहे. या रोपवाटिकेत कोहमारा येथील महिला व पुरूष मजुरांना रोजगार दिल्याची माहिती वनरक्षक रमेश काळबांधे यांनी दिली.
उन्हाळ्याच्या दिवसात या रोपवाटिकेतील रोपांची निगा घेतली जात होती. त्या रोपांना उन्हाचा त्रास होवू नये याकरीता ग्रीन नेट लावून उन्हाचे तड्याख्यापासून बचाव करण्यात आल्याची माहिती वनक्षेत्र सहाय्यक वसंत नाकाडे यांनी दिली. सडक/अर्जुनी तालुक्यात जागा मिळेल तिथे रोपवन लावून सडक/अर्जुनी तालुका हा हिरवागार करण्याची संकल्पना वनपरिक्षेत्र दिलीप वडेट्टीवार यांनी मांडली आहे. या तालुक्यात ओसाड असलेल्या जागेवर रोपाची लागवड जुलै महिन्यात करण्यात येणार असून ही रोपवन जगविण्याकरिता गाव परिसरातील लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वडेट्टीवार यांनी केले आहे.
रोजगार हमी योजनेंतर्गत कोहमारा येथील रोपवाटिकेत वाटर पंपच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा करण्यात आली आहे. लहान रोपांना पाणी देण्यासाठी स्प्रेंकलर झाराचा उपयोग करून सिंचनाची सोय होत आहे. रोपांच वाढीसाठी खत व किड लागू नये यासाठी किटकनाशके व झाडांच्या वाढीसाठी वृक्षवर्धक घटकांची फवारणी वेळोवेळी केली जात आहे.
सडक/अर्जुनी तालुक्यात हेटी, डव्वा, बकी, चिरचाडी,गोपाळटोली, मनेरी, पिंडकेपार, कनेरी, बोपाबोडी या गावातील रोपवनात अंदाजे १३० हेक्टर क्षेत्रात रोपाची लागवड करण्यात येणार आहे. रोपवनाची खरी जोपासना करण्यासाठी वन विभाग, वनव्यवस्थापक समिती व गावकऱ्यांचे सहकाऱ्यातून गाव परिसर हिरवेगार करण्याचे स्वप्न सर्वांनी मनी बाळगले पाहिजे. ही संकल्पना सर्वांनी मनी बाळगली तर संपूर्ण सडक/अर्जुनी तालुका हिरवेगार झाल्याशिवाय राहणार नाही हे विशेष!