शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक संपन्नतेसाठी योजना राबवा

By admin | Updated: December 22, 2015 02:00 IST

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. विविध घटकातील लाभार्थ्यांची

गोंदिया : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. विविध घटकातील लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ज्या योजनांमुळे सुधारता येईल, अशा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश पालक सचिव पी.एस. मीना यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात १९ डिसेंबर रोजी जिल्हा वार्षिक योजना सन २०१५-१६ चा आढावा घेताना ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांची प्रमुख उपस्थिती होती. मीना पुढे म्हणाले, जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच विविध विकास कामे करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नियोजन करावे. मजुरांना निर्धारित वेळेत त्यांची मजुरी द्यावी. या योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या विहिरींची कामे त्वरित करून विविध घटकातील लाभार्थी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागणार आहे, असे ते म्हणाले.कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती करण्यासाठी बेरोजगार युवक-युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण द्यावे. कृषी व वन विभागाने समन्वयातून मोठ्या प्रमाणात फळझाडांची लागवड करावी असे सांगून मीना म्हणाले, त्यामुळे फळांमधून जीवनसत्व मिळण्यास मदत होईल. ठिबक सिंचन क्षेत्र वाढले पाहिजे. तसेच सौर कुंपनासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे शेतीसोबतच जंगलाचे संरक्षण होईल. जंगलाचे संरक्षण व संवर्धनासाठी आदिवासी उपयोजनेचा निधी आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी वापरता येईल, असेही मीना या वेळी म्हणाले.या वेळी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना या अंतर्गत सन २०१५-१६ मध्ये नोव्हेंबर २०१५ अखेर झालेल्या खर्चाची माहिती देण्यात आली. बैठकीस विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)तलावांतील गाळ काढून मत्स्योत्पादनावर भर द्या४जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात असलेल्या माजी मालगुजारी तलावातील गाळ काढावे. त्यामुळे सिंचन क्षमता वाढून भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. विविध शासकीय इमारतींचे बांधकाम करताना कामाचा दर्जा उत्तम असला पाहिजे. कामाची देखरेख चांगल्याप्रकारे झाली पाहिजे, असे सांगून मीना म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव आहेत या तलावांमधून मत्स्योत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यासाठी मत्स्य सहकारी संस्थांना सहकार्य करावे.