पांगोळी नदीत उलटला पेट्रोल टँकर

By Admin | Updated: January 7, 2016 02:20 IST2016-01-07T02:20:28+5:302016-01-07T02:20:28+5:30

आमगावकडून गोंदियाकडे येणारा पेट्रोलचा टँकर पांगोळी नदीच्या पुलावरून नदीत कोसळल्याने चालक जखमी झाला.

Petrol tanker reversed in Pongoli river | पांगोळी नदीत उलटला पेट्रोल टँकर

पांगोळी नदीत उलटला पेट्रोल टँकर


गोंदिया : आमगावकडून गोंदियाकडे येणारा पेट्रोलचा टँकर पांगोळी नदीच्या पुलावरून नदीत कोसळल्याने चालक जखमी झाला. ही घटना बुधवारच्या सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामागील असलेल्या पांगोली नदीच्या पुलावर घडली.
एमएच ३६/फ-२४५९ असा सदर टँकरचा क्रमांक आहे. नागपूर येथून पेट्रोल आणण्यासाठी तो टँकर जात होता. समोरून येणाऱ्या वाहनाच्या हॅडलाईटचा प्रखर प्रकाश टँकर चालकाच्या डोळ्यावर पडल्याने वाहन चालकाचे संतुलन बिघडले. यात पुलावर असलेल्या कठड्यांना तोडून टँकर नदीत कोसळला. यात वाहन चालक किरकोळ जखमी झाला. सदर घटनची नोंद गोंदिया ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Petrol tanker reversed in Pongoli river