शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाच्या वापरासाठीही परवानगी

By admin | Updated: September 30, 2014 23:38 IST

निवडणूक प्रचारामध्ये हायटेक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. सोशल मिडियावर पोस्ट किंवा छायाचित्र टाकून राजकिय पक्ष तसेच उमेदवार मतदारांशी संपर्क साधत आहे. बल्कने एसएमएस

गोंदिया : निवडणूक प्रचारामध्ये हायटेक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. सोशल मिडियावर पोस्ट किंवा छायाचित्र टाकून राजकिय पक्ष तसेच उमेदवार मतदारांशी संपर्क साधत आहे. बल्कने एसएमएस पाठवूनसुद्धा संपर्क साधण्यात येत आहे. परंतू या सर्व गोष्टीसाठी परवानगी घेण्याची गरज आहे.तेराव्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव, तिरोडा, गोंदिया व आमगाव या विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.या चार विधानसभा मतदानसंघातील सर्व उमेदवार व मतदारांनी सोशल मिडियाचा वापर करताना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा प्रचारमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीची पुर्व परवानगी घेणे आवश्यक आहे असे समितीचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी कळविले आहे.सार्वत्रिक विधानसभा निवडणुक लढविणारे राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आपले सोशल नेटवर्किंग अकाऊंट निवडणुक निर्णय अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे.राजकीय पक्ष व उमेदवारांनी आपले फेसबुक, वॉट्सअ‍ॅप, युट्यूब तसेच संकेतस्थळाची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी यांनी द्यावी. सोशल मिडियाच्या व बल्क एसएमएसच्या माध्यमातून प्रचार करणाऱ्या राजकीय पक्ष उमेदवारांनी प्रसारमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडून जाहिरात प्रमाणित करुन द्यावी. त्यानंतर सोशल मिडियावर ती टाकावी. ही समिती उघडपणे किंवा गुप्तपणे उमेदवरांशी संबंधित असणाऱ्या सर्व राजकिय जाहिरातींचे सनियंत्रण करणार आहे. उत्साहाच्या भरात या मिडियाचा वापर करणारे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मतदार व नागरिक हे राजकीय प्रचार करणाऱ्या पोस्ट, छायाचित्र व व्हिडिओ अपलोड करतात तसेच ते एकमेकांना पाठवितात. हे आयोगाच्या निकषानुसार योग्य नसून नागरिकांनी निवडणुकीच्या काळात सोशल मिडियाचा वापर काळजीपुर्वक करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी केल्या आहेत. त्याचप्रमाणे कोणत्याही उमेदवारांची तसेच कुठल्याही समाजाची किंवा व्यक्तिची बदनामी होणार नाही. तसेच त्या दोन कोणत्याही उमेदवारांची तसेच कुठल्याही समाजाची किंवा व्यक्तिची बदनामी होणार नाही. तसेच त्या दोन समाजात तणाव निर्माण होणार नाही. अशाप्रकारचा मजकूर सोशल मिडियावर टाकू नये. सोशल मिडियावर प्रसारमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीचे लक्ष असून तसेच पोलीस विभागाचा सायबर सेल सुद्धा यावर नियंत्रण ठेवून आहे. समाजात तणाव निर्माण होणारा मजकूर व वैयक्तिक बदनामी करणारे छायाचित्र, व्हिडिओ किंवा पोस्ट टाकल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल. बल्क एसएमएसवर समितीचे लक्ष असून त्याचा खर्च उमेदवाराच्या निवडणुक खर्चात जोडला जाणार आहे. याबाबतची माहिती खर्च नियंत्रण समितीला देण्यात येईल. उमेदवारांनी बल्क एसएमएस पाठविण्यासाठी सुद्धा समितीची पुर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. निवडणुक आयोगाने वॉट्सअ‍ॅप या मोबाईल नेटवर्किंगवरुन होणाऱ्या प्रचाराला प्रमाणनाच्या कक्षेत आणले आहे. तरी निवडणुक लढविणाऱ्या राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी सोशल मिडियावरील आपल्या प्रचार साहित्याची पुर्व परवानगी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी व प्रसारमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांनी केले.