शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण वाढीचा वेग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST

कोरोना संसर्ग वाढत असल्याने आरोग्य व जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग तिप्पट झाल्याने २७ ऑगस्टपर्यंत ९५९ हून अधिक रुग्ण आढळले आहे.कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गुरूवारी आढळलेल्या ६५ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ५१ रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहेत.

ठळक मुद्दे६५ बाधितांची भर : ११ जणांची कोरोनावर मात, ४३२ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून गोंदिया शहरात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने शहर कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. गोंदिया शहरात मागील ४८ तासात १०२ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.जिल्ह्यात गुरूवारी (दि.२७) ६५ कोरोना बाधितांची भर पडल्याने कोरोना अ‍ॅक्टीव्ह रूग्णांचा आकडा ४३२ वर पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. आतापर्यंत एकूण १२४८ कोरोना बाधित आढळले आहे.७८३ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तिरोडा तालुक्यातील एका कोरोना बाधिताचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनाचा १६ वा बळी गेला आहे.कोरोना संसर्ग वाढत असल्याने आरोग्य व जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग तिप्पट झाल्याने २७ ऑगस्टपर्यंत ९५९ हून अधिक रुग्ण आढळले आहे.कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गुरूवारी आढळलेल्या ६५ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ५१ रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहेत.गोंदिया शहरातील बाजपेयी वार्ड, झोपडपट्टी मोहल्ला येथील प्रत्येकी एक रुग्ण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील दोन रुग्ण, सिव्हिल लाईन येथील दोन, कुंभारेनगर येथील पाच, गौतमनगर येथील दोन, आंबाटोली येथील दोन, सेलटॅक्स कॉलनी येथील दोन, रामनगर येथील एक,शास्त्री वॉर्डातील तीन, सुभाष वॉर्डातील एक,रिंग रोड वरील तीन, पंचायत समिती कॉलनी येथील एक, कुडवा येथील सहा, नवरगाव येथील एक, अंभोरा रावणवाडी येथील एक, मास्टर कॉलनी येथील एक, कस्तुरबा वॉर्ड येथील एक, गांधीवार्ड येथील एक, धापेवाडा येथील एक,न्यू लक्ष्मीनगर येथील एक, नागरा येथील एक, चारगाव येथील एक, राजाभोज कॉलनी येथील एक, मरारटोली येथील एक, पाल चौक येथील एक, वीर सावरकर वॉर्ड दोन, गणेशनगर येथील एक, रेलटोली येथील एक आणि एक रुग्ण प्रताप वॉर्डातील आहे.तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव, बेरडीपार, खैरबोडी येथील एक, खडकी येथील दोन, तिरोडा शहरातील सुभाष वॉर्ड व संत कबीर वॉर्ड येथील प्रत्येकी एक, शहीद मिश्रा वॉर्डातील चार, तिरोडा शहरातील एक रु ग्ण आहे.आमगाव तालुक्यातील तिगाव येथील एक, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बुधेवाडा येथील एक रुग्ण असे एकूण ६५ रुग्ण आढळून आले. तर तिरोडा येथील एका ४८ वर्षीय रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.१३६०१ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत गोंदिया येथील प्रयोगशाळेत एकूण १५ हजार २९७ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी १३ हजार ६०१ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १२३० नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. २८३ स्वॅब नमुन्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून अद्याप प्राप्त व्हायचा आहे. ४४९ नमुन्यांचा अहवाल अद्याप अनिश्चित आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या