शहरं
Join us  
Trending Stories
1
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
2
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
3
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
4
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
5
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
7
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
8
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
9
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
10
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
11
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
12
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
13
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
14
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
15
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
16
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
17
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
18
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
19
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
20
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

बारदाणाअभावी धान खरेदी प्रभावित

By admin | Updated: December 7, 2014 22:52 IST

वर्षभर शेतात मेहनत करुन सुद्धा धानाची समर्थन मूल्यावर विक्री करण्याकरिता शेतकऱ्यांना जीवाचा आटापीटा करावा लागत असल्याचे चित्र तालुक्यातील सर्वच धान खरेदी केंद्रावर दिसून येत आहे.

देवरी : वर्षभर शेतात मेहनत करुन सुद्धा धानाची समर्थन मूल्यावर विक्री करण्याकरिता शेतकऱ्यांना जीवाचा आटापीटा करावा लागत असल्याचे चित्र तालुक्यातील सर्वच धान खरेदी केंद्रावर दिसून येत आहे. आदिवासी विकास महामंडळ द्वारा संचालित तालुक्यातील सर्व आधारभूत धान खरेदी केंद्रावर शासनाच्या दिरंगाईमुळे बारदाने पूर्णपणे मिळाले नसल्याने खरेदी केंद्रावर धान खरेदी पूर्णपणे बंद आहे.
प्राप्त माहितीनुसार, येथील आदिवासी विविध कार्य. संस्थेत आतापर्यंत फक्त तीन हजार ५०० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. या खरेदी केंद्राद्वारे सोळा हजार बारदाण्याची मागणी आदिवासी महामंडळ विभागाला केली असता त्यांनी केवळ आठ हजार बारदाने पुरवील्याचे सांगण्यात आले.
सध्या बारदाने नसल्यामुळे खरेदी बंद करण्यात आली आहे. मागील १५ दिवसांपासून बारदाने नसल्याने शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल धान उघड्यावर ठेवला असून केंद्रात कॅप कव्हरची व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना आपल्या घरुन चादरी व महिलांच्या साड्या आणून धानाच्या बोऱ्यांवर झाकावे लागत आहे. दुसरीकडे धान उघड्यावर असल्याने धानाची चोरी होण्याची भिती असल्याने ऐन कडकडत्या थंडित रात्रंदिवस जागून धानाची सुरक्षा करावी लागत असल्याने क्षेत्रातला शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
सर्व शेतकऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक वजनाची मागणी करून सुद्धा अजूनपर्यंत इलेक्ट्रानिक वजन प्राप्त न झाल्याने कित्येक केंद्रावर शेतकऱ्यांची लूट होताना दिसून येत आहे.
या सर्व समस्येबाबत क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी प्रादेशिक व्यवस्थापक व महाव्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांच्याशी चर्चा करुन त्वरित बारदाने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)