शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

भातपिकाचे क्षेत्र वाढणार

By admin | Updated: November 24, 2014 22:58 IST

खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने धानपिकाच्या उत्पादनात यावर्षी घट येत असली तरी शेतकऱ्यांना रबी हंगामाची आशा आहे. सध्या सर्वांच्या नजरा रबी हंगामातील धानपिकांकडे वळल्या आहेत.

रबी हंगामाचे नियोजन : कडधान्य, गव्हाचीही लागवड वाढणारदेवानंद शहारे - गोंदियाखरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने धानपिकाच्या उत्पादनात यावर्षी घट येत असली तरी शेतकऱ्यांना रबी हंगामाची आशा आहे. सध्या सर्वांच्या नजरा रबी हंगामातील धानपिकांकडे वळल्या आहेत. त्यामुळे यावर्षी रबी हंगामात धानपिकाचे क्षेत्र वाढणार असून त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. जिल्ह्यात रबी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ३४ हजार २०० हेक्टर आहे. मात्र जिल्हा कृषी कार्यालयाने यंदा रबी पिकाच्या सर्वसाधारण क्षेत्रात वाढ करून ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. त्यामुळे रबीच्या पिकांमधून तरी कर्जमुक्ती होईल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.सर्वसाधारणपणे रबी पिकांमध्ये गहू, हरभरा, जवस, भाजीपाला, उन्हाळी भातपिकांसह इतर कडधान्य पिकांचा समावेश असतो. कडधान्य पिकांमध्ये लाखोळी, वाल, वटाणा, चवळी, मूग, उडीद व पोपट या पिकांचा समावेश आहे. सन २०१२-१३ मध्ये जिल्ह्यात एकूण ४४ हजार हेक्टरमध्ये रबी पिकांचे उत्पादन घेण्यात आले होते. यात गव्हाची लागवड दोन हजार ३७२ हेक्टर क्षेत्रात तर हरभऱ्याची लागवड सहा हजार ७९४ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली होती. जवस पिकाची लागवड आठ हजार १४५ हेक्टर क्षेत्रात, भाजीपाला दोन हजार ०७४ हेक्टर क्षेत्रात तर उन्हाळी भातपिकाची लागवड ११ हजार ५०७ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली होती. याशिवाय लाखोळी, वाल, वटाणा, चवळी, मूग, उळीद व पोपट या इतर कडधान्य पिकांची लागवड १९ हजार ९०७ हेक्टर क्षेत्रामध्ये करण्यात आली होती.विशेष म्हणजे सन २०१२-१३ मध्ये लागवड झालेल्या रबी पिकांच्या क्षेत्रात सन २०१३-१४ मध्ये नऊ हजार ५७४ हेक्टरने वाढ झाली. यात हंगामात जिल्ह्यात एकूण ५३ हजार ५७८ हेक्टर क्षेत्रात रबीचे पीक घेण्यात आले. यात गहू दोन हजार ६६८ हेक्टरमध्ये, हरभरा सात हजार ८४१ हेक्टरमध्ये, जवस आठ हजार ८१२ हेक्टरमध्ये, भाजीपाला दोन हजार ३६८ हेक्टरमध्ये तर उन्हाळी भातपिकाची लागवड १८ हजार १०९ हेक्टर क्षेत्रामध्ये करण्यात आली होती. तसेच इतर कडधान्य पिकांमध्ये लाखोळी, वाल, वटाणा, चवळी, मूग, उळीद व पोपट यांची लागवड १० हजार ८०० हेक्टरमध्ये करण्यात आली होती.