शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

दोन महसूल मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:00 IST

यंदा जिल्ह्यात पावसाने सुरूवातीपासूनच पाठ फिरविली आहे. त्यामुळे जवळपास ४५ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नदी, नाले अद्यापही कोरडे पडले असून सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे संकटात आला आहे. अर्जुनी मोरगाव, देवरी, गोंदिया, सालेकसा,तिरोडा या तालुक्यांमध्ये अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही.

ठळक मुद्देजिल्हावासीयांना दमदार पावसाची प्रतीक्षा : गेल्या २४ तासात ३२२.२० मिमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामान खात्याने गुरूवारपासून जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. गुरूवारी (दि.६) पावसाने गोंदिया, आमगाव, गोरेगाव तालुक्यात दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला होता. त्यानंतर शुक्रवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात दमदार हजेरी लावली होती. गेल्या २४ तासात सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड आणि सडक अर्जुनी महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण ३२२.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे.ऑगस्ट महिन्याला सुरूवात होवून सात दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी जिल्ह्यातील १ लाख हेक्टरवरील रोवणी खोळंबली आहे. तर पºहे सुध्दा वाळत असल्याचे चित्र काही भागात आहे. धानाची रोवणी करण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंतचा कालावधी अनुकुल मानला जातो.मात्र यंदा जिल्ह्यात पावसाने सुरूवातीपासूनच पाठ फिरविली आहे. त्यामुळे जवळपास ४५ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नदी, नाले अद्यापही कोरडे पडले असून सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे संकटात आला आहे. अर्जुनी मोरगाव, देवरी, गोंदिया, सालेकसा,तिरोडा या तालुक्यांमध्ये अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे खरिपातील धान पिकांवर अद्यापही संकट कायम आहे.जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३२२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सकड अर्जुनी तालुक्यातील सौदंड महसूल मंडळात ६५.२० मिमी आणि सडक अर्जुनी महसूल मंडळात ७० मिमी पाऊस झाल्याने या दोन्ही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गुरूवारी सुध्दा सडक अर्जुनी, गोरेगाव, आमगाव या तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने या भागातील रोवणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र उर्वरित भागातील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यतायंदा आॅगस्ट महिन्याला सुरूवात झाली तरी रोवणीची कामे आटोपलेली नाही. अद्यापही जिल्ह्यातील ५० टक्के रोवणी शिल्लक आहे. पावसाला विलंब होत असल्याने रोवणीचा अनुकुल कालावधी निघून जात आहे.त्यामुळे रोवणीच्या कामाला विलंब होत असल्याने याचा धानाचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यात मागील २४ तासात पडलेला पाऊसजिल्ह्यात मागील २४ तासात आठही तालुक्यात एकूण ३२२.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गोंदिया ७ मिमी, गोरेगाव २.८० मिमी, तिरोडा ६७.४० मिमी, अर्जुनी मोरगाव २२.२० मिमी, देवरी ६४ मिमी, आमगाव ८.८० मिमी, सालेकसा ६.८० मिमी, सडक अर्जुनी १४३.२० मिमी अशा एकूण ३२२.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर