शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

सेवेतील दिरंगाईसाठी रेल्वेला भरपाईचे आदेश

By admin | Updated: September 16, 2014 23:49 IST

छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये पाणी, विद्युत व टीटीईची सुविधा उपलब्ध न करविल्यामुळे मध्यवर्ती रेल्वेला २० हजार रूपये नुकसानभरपाई व १० हजार रूपये तक्रार खर्चापायी देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक

ग्राहक मंच : असुविधेसाठी फटकागोंदिया : छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये पाणी, विद्युत व टीटीईची सुविधा उपलब्ध न करविल्यामुळे मध्यवर्ती रेल्वेला २० हजार रूपये नुकसानभरपाई व १० हजार रूपये तक्रार खर्चापायी देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक संरक्षण मंचचे दिला आहे.प्राप्त माहितीनुसार, आयकर सल्लागार अ‍ॅड.सुधीर राठोड ३ नोव्हेंबर २०११ च्या सायंकाळी हबीबगंज (भोपाळ) स्थानकातून छत्तीसगड एक्सप्रेसच्या एस-११ मध्ये गोंदियाला येण्यासाठी बसले. यावेळी त्यांना बोगीत पाणी, विद्युत व टीटीई उपलब्ध नसल्याचे आढळले. पाणी, विद्युत व टीटीईविनाच प्रवास करीत असल्याची तक्रार त्यांचे सहप्रवाशीसुद्धा करीत होते. गाडी जेव्हा इटारसी स्थानकावर पोहोचली, तेव्हा राठोड यांनी इटारसीच्या प्लॅटफार्मवरील टीटीईला या प्रकाराची तोंडीच तक्रार केली. यावर ते म्हणाले की, पाणी व विद्युतची सोय नागपुरात होवू शकेल. मात्र नागपूर स्थानक आल्यावरही कोचमधील विद्युत सुधारणा करण्यात आली नाही, तसेच पाणीसुद्धा भरण्यात आले नाही.गोंदियात पोहोचताच राठोड यांनी ४ नोव्हेंबर २०११ रोजी लिखित तक्रार नोंदविली. मात्र रेल्वे विभागाकडून कसलेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण मंच गोंदियाकडे रेल्वे विभागाच्याविरूद्ध ग्राहक असुविधेसाठी मानसिक व शारीरिक छळ झाल्याची तक्रार २६ मार्च २०१३ रोजी केली. तसेच नुकसानभरपाईची मागणी केली. राठोड यांनी माहितीच्या अधिकार अधिनियमांतर्गत रेल्वेकडून माहिती मागितली. त्यात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सदर तारखेला एस-१, २, ३, ७, ११ व १२ या डब्यांमध्ये टीटीई उपलब्ध करविण्यास रेल्वे विभाग असमर्थ असल्याचे दिसले. तसेच नागपूर स्थानकात एस-११ कोचमध्ये पाणी न भरण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्वीकार केले. राठोड यांनी सादर केलेल्या कागदपत्रांचे निरीक्षक व दोन्ही पक्षांचे मत ऐकल्यानंतर जिल्हा ग्राहक संरक्षण मंचचे अध्यक्ष अतुल आळसी व सदस्य वर्षा पाटील यांनी अ‍ॅड.राठोड यांनी तक्रार योग्य ठरविली. तसेच रेल्वे विभागाद्वारे ग्राहकांच्या सेवेत त्रृटी झाल्याने सेंट्रल रेल्वेला २० हजार रूपयांची नुकसानभरपाई १२ टक्के व्याजासह व तक्रार खर्चापायी १० हजार रूपये देण्याचे आदेश दिले. तक्रारकर्ते राठोड यांनी आपला पक्ष स्वत: व अ‍ॅड. सुमीत राजनकर यांच्यामार्फत तर रेल्वेकडून अ‍ॅड. डी.जी. वडेकर यांनी पक्ष मांडला होता. (प्रतिनिधी)