कोंबड बाजारावर धाड, आठ जण अटकेत

By Admin | Updated: January 5, 2016 02:03 IST2016-01-05T02:03:28+5:302016-01-05T02:03:28+5:30

घाटकुरोडा वैनगंगा नदी तिरावर सुरू असलेल्या कोंबड्याच्या शर्यतीवर पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी अगदी

Onion, eight people detained on cockpit market | कोंबड बाजारावर धाड, आठ जण अटकेत

कोंबड बाजारावर धाड, आठ जण अटकेत

तिरोडा : घाटकुरोडा वैनगंगा नदी तिरावर सुरू असलेल्या कोंबड्याच्या शर्यतीवर पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी अगदी मोजक्या पोलीस कर्मचाऱ्यांसह धाड घालून आठ जणांना अटक केली.
गुप्त माहितीच्या आधारे रविवारला दुपारी २.३० वाजतादरम्यान सदर कारवाई करण्यात आली. बरेच दिवसाप्ाांसून नदी तिरावर कोंबड बाजार भरत होता. या कारवाईत सुरेश गोस्वामी (३०) रा. बोरी, ता. मोहाडी, गणेश मेश्राम (४०) रा.पालोरा, लोकेश किरणापुरे (३०) रा. टेमनी शेषराव निमकर (४२) रा. तुमसर, अंगद कुंभारे (४३) रा. मोहाडी, संदीप रंभाड (२४) मोहाडी, शैलेष कटनकर (२१) रा. शिवनी, जितेंद्र खरवडे (२४) रा. शिवनी यांना अटक करण्यात आली. बाकी आरोपी नदी ओलांडून पळून गेले. घटनास्थळाहून रु.१५०० रोख, सात मोबाईल फोन व ४० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. सदर कारवाईने जुगार शौकिनांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत पो.नि.देशमुख यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक योगेश इंगळे, पोलीस हवालदार सचिन टेंभुर्णीकर, लितेश गोस्वामी, मनोहर गावळकर, राजू बनवे, प्रकाश शिरसे, सुजीत हलमारे व सुनिल येरणे सहभागी झाले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Onion, eight people detained on cockpit market