कार अपघातात एक ठार, दोन जखमी

By Admin | Updated: December 7, 2015 05:52 IST2015-12-07T05:52:56+5:302015-12-07T05:52:56+5:30

भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्याक डेला खड्यात जाऊन पडली.या

One killed, two injured in car accident | कार अपघातात एक ठार, दोन जखमी

कार अपघातात एक ठार, दोन जखमी

देवरी : भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्याक डेला खड्यात जाऊन पडली.या अपघातात कारमधील एका महिलेचा मृत्यू झाला असून दोघे जखमी आहेत. रविवारी (दि.६) सकाळी १० वाजतादरम्यान ही घटना घडली असून राजश्री राजू लांजेवार (४०, रा.देवरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयात अव्वल कारकून पदावर कार्यरत राजू लांजेवार (४५) हे पत्नी राजश्री लांजेवार व बहीण लक्ष्मी राधेश्याम उरकुडे (५०, रा.ओझरसिंग, नाशिक) यांच्यासह स्वत:च्या स्वीफ्ट कार एमएच३५/पी ३२८१ ने गोरेगावला जात होते. दरम्यान चालकाने कारवरील नियंत्रण सुटल्याने कार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील मासुलकसा शिवारात रस्त्याच्याकडेला खड्यात पडली.
या अपघातात कार उलटी झाल्याने राजश्री लांजेवार यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना ग्रामीण रूग्णालयात आणताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. बहिण लक्ष्मी उरकुडे यांनाही डोक्याला मार लागल्याने त्यांना गोंदियाला हलविण्यात आले आहे. तर राजू लाजेवार हे जखमी असल्याने त्यांच्यावर येथेच उपचार सुरू आहेत. शिवाय कारचालक फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना कळताच देवरीत शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. राजू लांजेवार मागील बऱ्याच वर्षांपासून देवरीतील उपविभागीय कार्यालयात कार्यरत असल्याने त्यांना देवरीवासीयांसोबत नेहमीचा संपर्क होता. शिवाय त्यांच्या पत्नी राजश्री येथील सीता पब्लिक स्कूलमध्ये मुख्याध्यापिका पदावर कार्यरत होत्या. त्यांचा मृतदेह रूग्णालयात ठेवण्यात आला असून सोमवारी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: One killed, two injured in car accident