शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटीच्या नळ योजनेच्या विहिरीचे काम निकृष्ट

By admin | Updated: May 27, 2014 23:49 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथे सन २0११ ते २0१२ या वर्षी मंजूर झालेल्या नळ योजनेचे काम सन २0१४ मध्ये सुरु करण्यात आले. मात्र कंत्राटदाराने विहीर बांधकाम करताना १0 ऐवजी ८ एमएमचे

पांढरी : सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथे सन २0११ ते २0१२ या वर्षी मंजूर झालेल्या नळ योजनेचे काम सन २0१४ मध्ये सुरु करण्यात आले. मात्र कंत्राटदाराने विहीर बांधकाम करताना १0 ऐवजी ८ एमएमचे गज वापरल्याने या कामाचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे ही विहिरी किती मजबूत होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वास्तविक निविदेच्या विवरणात या विहिरीसाठी १0 एमएमचा गज वापरणे गरजेचे होते. मात्र प्रत्यक्षात पैसे वाचविण्यासाठी भंडारा येथील कंत्राटदार शिंदे यांनी आठ एमएमचे गज रिंग बांधताना वापरले. यामुळे विहिरीचे काम हलक्या दर्जाचे होत आहे.

शासनाने लाखो रुपये खर्च करुन विहीर बांधण्याकरिता निधी उपलब्ध करून दिला असताना कंत्राटदाराची ही कृती बांधकामाचा दर्जा कमी करणारी आहे. याप्रकरणी कंत्राटदाराकडे शहानिशा केली असता त्यांनीसुद्धा आठ एमएम लोखंडाचा वापर केल्याची कबुली दिली. वास्तविक ही विहीर नाल्याच्या जवळ आहे. त्यामुळे अतवृष्टीमुळे ही विहीर खचली तर जबाबदार कोण, असा प्रश्न गावकर्‍यांना पडला आहे. ‘पायवा मजबूत असला तर घर मजबूत’ अशा उक्तीप्रमाणे कंत्राटदाराने चांगले काम करायला पाहिजे, अशी अपेक्षा केली जात आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी या ठिकाणी बनवलेल्या विहिरीची तपासणी करून चौकशी करावी आणि हे काम अधिक चांगल्या दर्जाचे होईल याकडे लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)