शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे... आठ दिवसात १००० कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरोना बाधितांचा आकडा एक हजार पार झाला आहे. तर आठ दिवसात १४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधितांच्या आकड्याचा नवीन विक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना बाधितांसह मृतकांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.

ठळक मुद्देसप्टेंबरमध्ये कोरोनाचा उद्रेक : १४ कोरोना बाधितांचा मृत्यू, संसर्ग वाढतोय वेगाने

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. १ ते ८ सप्टेंबर दरम्यान तब्बल एक हजार कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर १४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा चांगलाच उद्रेक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रुग्ण वाढीचा आकडा तीन आकडी झाला असल्याने जिल्हावासीयांच्या तोंडातून अरे बापरे... हेच वाक्य निघत आहे.जिल्ह्यात मार्च ते जुलै या पाच महिन्याच्या कालावधीत केवळ २८८ कोरोना बाधित होते तर ४ बाधितांचा मृत्यू झाला होता. मात्र आॅगस्ट महिन्यापासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.आॅगस्ट महिन्यात ११९३ कोरोना बाधित आणि १४ कोरोना बाधिताचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे चित्र होते. सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्ण वाढीचा दर कमी होईल असा अंदाज आरोग्य विभागाकडून वर्तविला जात होता. मात्र अंदाज देखील पूर्णपणे फसला आहे.सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरोना बाधितांचा आकडा एक हजार पार झाला आहे. तर आठ दिवसात १४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधितांच्या आकड्याचा नवीन विक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना बाधितांसह मृतकांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.सप्टेंबर महिन्यातील कोरोना रुग्ण मृत्यूचा दर १.४ टक्के झाला आहे. त्यामुळे हा महिना कोरोना उद्रेकाचा ठरत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.कोरोना बाधितांचा मृत्यूदर १.४जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून कोरोना बाधितांच्या मृत्यू संख्येत सुध्दा वाढ होत आहे. १ ते ८ सप्टेंबर दरम्यान १ हजार कोरोना बाधित रुग्ण आढळले असून १४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बाधितांचा मृत्यू दर १.४ टक्के झाले आहे. तर अजुनही संपूर्ण महिना बाकी असून मृतकांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी सुध्दा विशेष काळजी घेण्याची गरज आहे.असा वाढला कोरोनाचा ग्राफजिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला त्यानंतर जवळपास दीड महिना जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र मे महिन्यापासून पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ झाली.मार्च महिन्यात १, मे ६४, जून ८४, जुलै १४४, ऑगस्ट ११९४ आणि ८ सप्टेंबरपर्यंत १००१ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या