शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अधिकार्‍यांचे आऊटगोइंग, इनकमिंग मात्र बंद

By admin | Updated: May 29, 2014 02:31 IST

गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशिल असला तरी या जिल्ह्याकडे महाराष्ट्र शासनाने पाठ फिरविली आहे.

गोंदिया : गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशिल असला तरी या जिल्ह्याकडे महाराष्ट्र शासनाने पाठ फिरविली आहे. जिल्ह्यातील पोलीस विभागात असलेल्या महत्वाच्या पदावरील अधिकार्‍यांचे पद मागील वर्षभरपासून रिक्त आहेत. तरी देखील गोंदिया जिल्ह्यातील आणखी पाच पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

गोंदिया येथील पोलीस उपअधीक्षक (गृह) वसंत गायकवाड सेवानवृत्त झाले. तेव्हापासून शासनाने या ठिकाणी पोलीस उपअधीक्षक (गृह) यांचे पद कायमस्वरूपी असलेले भरले नाही. पोलीस निरीक्षकांना प्रभारी म्हणून नियुक्त करून कामकाज भागविला जात आहे. या जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचेही पद रिक्त आहे. लोकसभेची आचारसंहिता लागण्यापुर्वी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्‍व पानसरे यांची पदली करण्यात आली. परंतु त्यांच्या जागी कोणालाही पाठविण्यात आले नाही. पोलीस अधीक्षक कर्यालयातील कार्यालयीन अधिक्षक हे पद देखील मागील वर्षभरापासून खाली आहे. त्या ठिकणीही कुण्या अधिकार्‍याला पाठविण्यत आले नाही. याच सोबत मुख्य लिपीकाचेही पद या कार्यलयात रिक्त आहे.

ज्या पेलिसांच्या भरवश्यावर जिल्ह्यातील जनता सुखाने झेापते त्याच पेलीस विभागात कर्मचारी, अधिकार्‍यांची वाणवा आहे. गोंदिया जिल्ह्यात मनुष्यबळाची कमतरता असताना पोलीस शिपायांची ३८0 पदे भरण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु ३८0 पैकी फक्त २३ जागा शासनाने देऊन पुन्हा जिल्ह्यावर अन्याय केला आहे. पोलीस यंत्रणा तोकडी असताना नुकतेच पाच पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांची बदली नागपूर ग्रामीण येथे करण्यात आली आहे. वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक संजय साबळे यंची बदली ठाणे शहर, देवरीचे ठाणेदार संजू जॉन यांची बदली ठाणे शहर, नियंत्रण कक्ष गोंदिया येथे तीन महिन्यापुर्वी रूजू झालेले शहाजी नरसुडे यांची बदली अहमदनगर येथे तर नवेगावबांध येथील प्रविण दरेकर यांची बदली बृहन्मुंबई येथे करण्यात आली आहे.

शासन नक्षलग्रस्त जिल्ह्याकडे विशेष लक्ष देण्याच्या फक्त बाता हाकत असते हेच यातून दिसून येते.