शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

समाजासह ओबीसींचेही नेतृत्व करावे

By admin | Updated: February 5, 2016 01:19 IST

संपूर्ण राज्यात विशेषत: विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या, सर्ववर्गीय कलार समाजात बहुसंख्य ...

तीर्थराज उके : विदर्भस्तरीय कोसरे कलार समाज मेळावा व परिचय संमेलनगोंदिया : संपूर्ण राज्यात विशेषत: विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या, सर्ववर्गीय कलार समाजात बहुसंख्य असणाऱ्या तसेच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय विकासापासून वंचित असणाऱ्या कोसरे कलार समाजाने सर्ववर्गीय कलार समाज तसेच ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या या समाजाने समस्त ओबीसी समाजाचेही नेतृत्व करावे, असे प्रतिपादन युवा कोसरे कलार समाज संस्थेचे अध्यक्ष तीर्थराज उके यांनी केले.मामा चौक, रेल्वे डब्लिंग ग्राउंडजवळ, सिव्हिल लाईन्समधील नूतन विद्यालयाच्या प्रांगणात विदर्भस्तरीय कोसरे कलार समाज मेळावा व उपवर-वधू परिचय संमेलन पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते.सदर मेळाव्यात अनेक राज्यातून पाच हजारच्या जवळपास कोसरे कलार समाजबांधवांची उपस्थिती होती. उद्घाटन मीताराम देशमुख यांच्या हस्ते, माजी आ. केशवराव मानकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. अतिथी म्हणून डॉ. कृष्णा राऊत, अलका बावणथडे, साहित्यिक राम महाजन, राजेश शहारे, फाल्गुन उके, प्रा. माधवराव उके, विजय उके, अरूण लाडे, नरेंद्र धुवारे, अनिल उके, मनोहरराव मेश्राम, रामलाल मेश्राम उपस्थित होते. उके पुढे म्हणाले, समाजाच्या इतर पोटजातीतील बांधवांनी आपसी मतभेद व उच्च-निचपणाची भावना बाजूला सारून एकत्रित, संघटीत व्हावे. सर्व क्षेत्रात प्रगतीशील राहून ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवाच्या आधारे व महिला व युवावर्गाने सर्वच क्षेत्रात पुढे नेण्यासाठी समोर यावे. समाजविकासासाठी आपले योगदान व सहकार्य द्यावे. कोसरे कलार समाजाला राजकीय विकासाच्या संधीची गरज असल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी सन २०१४-१५ मध्ये दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात तसेच विविध शिष्यवृत्ती, गणित प्राविण्य परीक्षा व शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्यप्राप्त २५ विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेत यशस्वी ११ विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. तसेच समाजाचा गौरव वाढविण्याऱ्या २५ बंधू-भगिणींचा सत्कार करण्यात आला. जवळपास १६० विवाहयोग्य उपवर-वधूंनी आपली नोंदणी करून घेतली. यानंतर महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम व विविध विषयांवर प्रबोधन करण्यात आले.प्रास्ताविक तिर्थराज उके यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन सुनिंद मेश्राम व गजेंद्र बावणथडे यांनी तर आभार दिनेश फरकुंडे यांनी केले. परिचर संमेलनाचे संचालन सतीश मेश्राम, सतीश दखने व नरेंद्र धुवारे यांनी केले. आभार संतोष मेश्राम यांनी मानले.कार्यक्रमासाठी अशोक मानकर, परमेश्वर कावळे, उमाकांत शहारे, जी.बी. मेश्राम, बालू कोसरकर, मुकेश शेंडे, देवा उके, संतोष मानकर, विजय कावळे, अनिल शेंडे, राकेश शेंडे, तृप्ती दरवडे, लता मानकर, मीना मेश्राम, शोभा बन्सोड, पुष्पा लाडे, वंदना मानकर, डिंपल उके, जैयवंताबाई उके, पुष्पा सहारे, किरण दखने आदी समाजबांधव व भगिणींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)आर्थिक विकासासाठी सदस्यता मोहीमकोसरे कलार समाजाचा आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीने व संस्थेच्या संकल्पनेतून समाजाची नियोजित राजराजेश्वर सहस्त्रार्जुन क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटी या नावे निर्माण होणाऱ्या कोसरे कलार समाजाच्या पतसंस्थेच्या सदस्यता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.